/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर तालुक्यातील इटकळ व परिसरात वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा.

Hot Posts

तुळजापूर तालुक्यातील इटकळ व परिसरात वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा.

तुळजापूर तालुक्यातील इटकळ व परिसरात वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ व परिसरात  वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.पतीला दीर्घायुष्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सुवासिनीने वडाची (वटवृक्ष) मनोभावी पूजा केली. ग्रामीण भागात सणवार यांना फार महत्व असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे सावित्रीने आपल्या पती सत्यवान यांचा प्राण परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपचर्या केली त्यामुळे यम राजाला तिचा पती परत द्यावाच लागला अशी सत्यवान व सावित्रीची कथा आहे.या कथेच्या आधारेच आजही वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करतात मंगळवार दि.१० जुन रोजी ईटकळ व परिसरात महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली . मराठमोळी साडी परिधान करून शृंगार करीत हातामध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन जाताना दिसत होत्या. केळी आंबा जांभूळ आदी सह विविध प्रकारचे फळे ठेवून झाडाला हळद-कुंकू लावून पूजा करून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून त्या भोवती प्रदक्षिणा घालत असल्याचे दिसून आले यावेळी महिला एकमेकाला हळदी कुंकू लावून वाण ही देत होत्या. एकंदरीत वटपौर्णिमा सण इटकळ व परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments