मौजे बाभळगाव येथे ग्रामस्थांच्या मदतीने उभारणार अंबाबाई मंदिर.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे बाभळगाव येथे ग्रामस्थांच्या मदतीने उभारणार अंबाबाई मंदिर.

तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथे ग्रामस्थांच्या मदतीने उभारणार अंबाबाई मंदिर.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""


इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे ग्रामस्थांच्या मदतीने उभारणार अंबाबाई मंदिर.मंगळवार दि.३ जुन २०२५ रोजीच्या  शुभ दिनी श्री अंबाबाई  मंदिर या देवस्थानचा बांधकामाचा शुभारंभ बाभळगावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक श्री नागनाथराव पंडितराव धरणे यांच्या शुभ हस्ते मंदिर बांधकाम शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी ह.भ. प. अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर , विविध विकास सोसायटीचे चेअरमन श्री अमर दादा पाटील ,माजी सरपंच श्री शिवाजी संपंगे ,श्री जितेंद्र पाटील ,श्री अनिल पाटील ,श्री सुनील पाटील ,श्री ज्ञानेश्वर जाधव ,श्री नामदेवराव चव्हाण ,श्री महादेव चव्हाण ,दिगंबर लोंढे ,प्रशांत गायकवाड, सौदागर पौळ, बांधकाम मिस्त्री श्री ह.भ.प. नागनाथ कांबळे ,सिद्राम भगत या सर्व गावकऱ्यांच्या शुभ हस्ते अंबाबाई मंदिर बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला या बांधकाम जागेसाठी श्री सुनील मुरलीधर पाटील व श्री अनिल मुरलीधर पाटील यांनी मंदिरासाठी जागा दानपत्र दिले तसेच या बांधकामासाठी अंदाजे दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे हा खर्च गावकऱ्यांच्या श्रमदानातून व गावकऱ्यांच्या देणगीच्या रूपातून करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments