Hot Posts

6/recent/ticker-posts

इटकळ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

इटकळ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक अगदी शांततेत पार पडली

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी राजमाता पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. शनिवार दि.३१ मे रोजी इटकळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली तर रविवार दि.१ जून रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. हनुमान मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग मराई चौक असा मिरवणुकीचा मार्ग होता. यावेळी भव्य अशा रथातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मिरवणुकीत सामील झाले जय मल्हार जय अहिल्या यळकोट यळकोट जय मल्हार हर हर महादेव अशा जय घोषाने अवघा परिसर दणाणला तरुणांनी मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण केली.विशेष म्हणजे या भव्य दिव्य अशा मिरवणुकीत सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला होता. न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक ग्रामस्थांना पाहायला मिळाली. पोलीस पाटील विनोद सलगरे व इटकळ औट पोस्टचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक शांततेत आणि शिस्तबध्द पार पडली.

Post a Comment

0 Comments