Hot Posts

6/recent/ticker-posts

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार.” तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार.” तीन जणाविरुद्ध  गुन्हा दाखल


धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे : अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून व घडला प्रकार कोठे सांगितल्यास वडील व चुलते यांना जिवे, ठार मारण्याची धमकी देऊन लैंगिक  अत्याचार केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी तीन तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये ढोकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेले अधिक माहिती अशी की,धाराशिव जिल्हातील  एका गावातील 13 वर्षीय मुलगी 29.04.2025 ते दि.16.06.2025 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. हिस गावातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. दि.16.06.2025 रोजी गावातील दुसऱ्या दोन तरुणांनी तिस बुलेटवर बसवून शेजारच्या गावातील रोडलगत असलेल्या पत्र्याचे शेडवर नेहुन दोघांनीही तिचेवर लैंगीक अत्याचार केला.घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला व तुझे वडील व चुलते यांना जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.23.06.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 64(2), (एम), (आय), 65(1),70(1), 351 (2),(3),3(5) सह पोक्सो कलम 4,5(जी),(एल),6, 8 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments