तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील वैष्णो देवी दूध डेअरी येथील भिंत कोसळली एक ठार तर जखमी.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
मयत रोहितसिंग हजारे यांचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथील वैष्णोदेवी दूध डेरीची भिंत कोसळून रोहितसिंग हजारे या मजुराचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी ही घटना शुक्रवार दि. 20 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.रोहितसिंग हजारे वय 28 वर्ष रा.अणदूर असे मृत मजुराचे नाव आहे तर बाळासाहेब घाडगे रा. कागल हा जखमी आहे त्याच्यावर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बाभळगाव येथील वैष्णोदेवी दूध डेरीत दूध भुकटी पावडर आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन होते मात्र शासनाच्या अनुदानाचा अपहार केल्याप्रकरणी ही दूध डेअरी चार ते पाच वर्षापासून बंद अवस्थेत होती अखेर ही दूध डेअरी दुसऱ्या व्यक्तीने भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी घेतली आहे त्यामुळे सहा महिन्यापासून या दूध डेअरीच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे नवीन बांधकाम केलेल्या इमारतीमध्ये नको असलेल्या चार इंच जाडीच्या भिंतीचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू होते.
शुक्रवारी सकाळी रोहितसिंग हजारे आणि बाळासाहेब घाडगे हे दोन मजूर हे बांधकाम पाडण्याचे काम करत होते मात्र व्हायब्रेटरने भिंत पाडत असताना संपूर्ण भिंतच कोसळली व या भिंतीखाली रोहितसिंग हजारे दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला तर बाळासाहेब घाडगे जखमी झाला याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मरत रोहितसिंग हजारे हा अणदूर येथील मूळ रहिवासी असून एक महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता तो एकुलता एक असून संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होते. रोहितसिंग हजारे यांच्या या आकस्मिक निधनामुळे अणदूर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments