सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दाखवून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.”

Hot Posts

6/recent/ticker-posts

सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दाखवून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.”

सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दाखवून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.”


धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: सोशल मीडियावर बदनामी करेल व माझ्याकडील पिस्तूलने मारून टाकीन अशी धमकी देऊन आत्महत्येस  प्रवर्त केल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील दोघाजणाविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत नामे-सारिका बिजली शिकारे, वय 15 वर्षे, 5 महिने रा. राजेश नगर ढोकी ता. जि. धाराशिव ह.मु. पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी  दि.31.05.2025 रोजी 04.00 वा.सु. राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे दोघे रा. कांक्रबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी नमुद मयत हिस वेळो वेळी बोलावून घेवून ओंकार कांबळे याचेवर प्रेम कर व लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर बदनामी करेल व माझ्या कडील पिस्तुलने मारुन टाकीन अशी धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळुन मयत सारिका शिकारे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बिजली मधुकर शिकारे, वय 35 वर्षे, रा. राजेश नगर ढोकी ता. जि. धाराशिव ह.मु. पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 107,351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments