/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या ७९ आरोपीस सक्तमजुरी , क़ळंब अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Hot Posts

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या ७९ आरोपीस सक्तमजुरी , क़ळंब अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार  करणाऱ्या ७९ आरोपीस सक्तमजुरी , क़ळंब अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे: दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या ७९ वर्षीय आरोपीस पाच वर्षे सक्त मंजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे सन 2020 मध्ये कळंब तालुक्यातील कोथळा येथे घडलेल्या दोन अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील एकूण 80 वर्षी आरोपीस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय न्यायालयाचे न्यायाधीश आर .के. राजे भोसले यांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायदे अंतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तसेच दुसऱ्या कलमांतर्गत १ वर्षे सक्तमजुरी  व १ हजार रुपये दंड सुनावण्यात आला.

या प्रकरणातील थोडक्यात हकीगत अशी की आरोपी साहेबराव नारायण बोबडे वय (५९) राहणार कोथळा तालुका कळंब यांनी 26 ते 29 नोव्हेंबर 2020 दरम्यान व त्यानंतर वारंवार घरांमध्ये बोलवून व पिडीता या अल्पवयीन आहेत हे माहिती असतानाही पीडितांच्या घरामध्ये कोणी नसताना त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या घरामध्ये शिरून दोन्ही अल्पवयीन मुलीवर पीडीतीवर बळजबरीने अत्याचार केला. आईच्या तक्रारीवरून तालुक्यातील शिरढोण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधानसहिता कलम ३७६ तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण २०१२ अंतर्गत कलम ४,८,१०,१२ आणि कलम ४५२ भारतीय दंड विधान संहिता याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील एडवोकेट आशिष कुलकर्णी यांचा युक्तिवाद गृहीत धरून न्यायालयाने आरोपीस पाच वर्षे सक्त मंजुरी व तीन हजार रुपये दंड व दुसऱ्या कलमांतर्एगत १ वर्षे सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा कळंब जिल्हा व सत्र न्यायाधीश आर के राजे भोसले यांनी सुनावली आहे. 

 या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी.व्ही गोडसे यांनी पूर्ण करून दोषारोपत्र कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले यांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये १३ व ६ वर्षे वय असलेल्या पिडीत  अल्पवयीन मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

Post a Comment

0 Comments