तुळजापूर : पीक कर्ज देण्यास टाळाटाळ, शेतकरी गणेश लगदिवे यांचे बँक ऑफ महाराष्ट्र समोर आमरण उपोषण
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे दि.१६ : तुळजापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने पीक कर्ज मंजूर करावेत, या मागणीसाठी बँकेसमोर तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील शेतकरी गणेश रामलिंग लगदिवे या शेतकऱ्याने सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.येथील होतकरू शेतकरी गणेश रामलिंग लगदिवे हे त्याच्यां पत्नीच्या नांवे फाईल केल्यावरही बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर ने अनेक नियम,अटी दाखवून शेती कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यामुळे संबंधित शेतकरी तुळजापूर बँकेच्या दरवाज्यासमोर दि.१६ सोमवार सकाळी १० वाजता अमरण उपोषणाला बसला आहे. C.M.E.G.P. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम अतंर्गत गणेश लगदिवे यांची पत्नी सौ.शिल्पा गणेश लगदिवे याच्यां नांवे शेतीसाठी ट्रँक्टर औजारे घेण्यासाठी कर्ज मागणी प्रस्ताव दाखल केला होता.पण बँकेच्या अनेक जाचक अटी,नियम,अडथळ्यामुळे संबधीत शेतक- याला महाराष्ट्र बँक कर्ज देत नसल्याने वैतागून संबंधित शेतकरी बँकेसमोर आमरण उपोषणाला बसला आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ पीक कर्ज व शेती अवजार कर्ज मंजूर करून द्यावी अशी मागणी होत आहे.
0 Comments