तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
![]() |
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा.
""""""""""""""'"''"""""""""""""""""""""""""""""
शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्य पुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस *“शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम”* मोठ्या उत्साहात पार पडला.नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे फुले व रंगीबेरंगी फुगे देऊन,स्वागत करण्यात आले.गुलाब फुल देऊन औक्षण करण्यात आले तसेच पायाचे ठसे घेण्यात आला.या प्रसंगी गावातील मान्यवर, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी गायकवाड सर यांनी नव्या विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेच्या शाळेच्या प्रथम दिनी शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य- मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले.शाळेच्या परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले.
शाळा प्रवेशोत्सवाच्या या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच साहेबराव क्षीरसागर, उपसरपंच श्री फिरोज मुजावर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रविण माशाळकर,शा. व्य सदस्य दयानंद गायकवाड , पोलीस पाटील विनोद सलगरे , शिक्षण प्रेमी राहुल बागडे शाळेचे सहशिक्षक श्री बालाजी कदम सर, पांडुरंग गायकवाड, सतीश ढोणे सर, नागेश स्वामी सर,शाळेच्या शिक्षिका श्रीमती.संगीता घुगे, श्रीमती. वैशाली देशमाने, श्रीमती. सारिका इंगळे श्रीमती. जया भोसले उपस्थित होते.कदम सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments