Hot Posts

6/recent/ticker-posts

नांदेड :मधमाशांच्या हल्ल्यात महिला पुरुष, जखमी वडाची पूजा करताना घडली घटना

नांदेड :मधमाशांच्या हल्ल्यात महिला पुरुष, जखमी वडाची पूजा करताना घडली घटना


नांदेड : परंपरेप्रमाणे दरवर्षी माहूर शहरात भाविक महिला कडून वटसावित्री पौर्णिमा निमित्त वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून वटसावित्री सण साजरा करतात. पौर्णिमेनिमित्त पूजा अर्चा सुरू असताना मधमाशांचे मोहोळ उठल्याने मधमाशांनी महिला व रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुषावर हल्ला केल्याने काही महिला व पुरुष जखमी झाले ही घटना दिनांक 10 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास माहूर शहरातील वार्ड क्रमांक पाच मधील हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाच्या पायथ्याशी घडली. यावेळी काही काळ महिलांची पळापळ झाली.

परंपरेप्रमाणे दरवर्षी वार्ड क्रमांक पाच मधील हनुमान मंदिरावरील ओट्यावर हजारो महिला दिवसभरात येऊन वटसावित्री पौर्णिमा साजरी करीत असतात.सकाळी साडेअकरा वाजता महिलांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविक महिलांनी अगरबत्ती ,धुप ,लावून नारळ अर्पण करून वटवृक्षाला सात प्रदर्शना घालून मनोभावी पूजा अर्चा केली होती. अशातच अगरबत्ती धूप वाढल्याने शेजारच्या झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले मधमाशाने अचानकपणे महिलावर हल्ला चढवला यामध्ये चंदा दिलीप पांडे वय (65) (राहणार ब्राह्मण गल्ली माहूर) आणि रस्त्यावरून चाललेले विलास मोतीराम पवार वय (45) राहणार बंजारा तांडा माहूर यांच्यावर मधमाशाने  जोरदार हल्ला केला त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले मधमाशांचा हल्ला झेलत गंभीर जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण वाघमारे यांनी जखमेवर उपचार केले.

Post a Comment

0 Comments