Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथे जाणता राजा क्रिकेट क्लबच्या वतीने वृक्षारोपण.* ""

तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे जाणता राजा क्रिकेट क्लबच्या वतीने वृक्षारोपण.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

विविध फळ झाडाच्या २०० रोपांचे केले वृक्षारोपण.


"""""""""""”"""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथे जाणता राजा क्रिकेट क्लबच्या वतीने पर्यावरणाचे योग्य संतुलन राहण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. इटकळ तुळजापुर रोडच्या बाजूस विविध फळ झाडाचे जवळपास २०० झाडे लावण्यात आली. आज बेसुमार अशी वृक्ष तोड झाल्याने निसर्गाचे संतुलन असंतुलित झाले आहे त्यामुळे मानवी जीवनावर विपरीत असा परिणाम होताना दिसतो.झाडे लावणे ही काळाची गरज आहे प्रत्येकानी एक तरी झाड लावणे गरजेचे आहे जेणे करुन भविष्यात पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होईल. हा भाव लक्षात घेऊन इटकळ येथील जाणता राजा क्रिकेट क्लबच्या खेळाडूनी वृक्षारोपण मोहीम हाती घेत जवळपास २०० वृक्ष लागवड केलेली आहे. हा उपक्रम जाणता राजा क्रिकेट संघाचे पांडुरंग माशाळकर, कबीर मिटकरी, दादा भोपळे , विकास बिराजदार, बालाजी गायकवाड, ओमकार पांढरकर व अजिंक्य सलगरे यांनी राबवला. या क्रिकेट खेळाडूंच्या सामाजिक कार्याचे कौतुक गाव परिसरातून केले जात आहे.

Post a Comment

0 Comments