सोलापूर: एक ऑगस्ट पासून मुंबईसाठी विमानसेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानसेवेचे सोमवारी उद्घाटन
सोलापूर: अनेक दिवसांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरकरांना आनंदाची बातमी दिली असून सोमवार दिनांक 9 जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सोलापुरातून विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे तसेच एक ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या फोनवरून सोलापुरातील पत्रकारांना दिली.
रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. दुपारी साडेतीन वाजता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला पत्रकार परिषद संपल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार कोठे यांच्या फोनवरून पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून मुंबई आणि तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत एक ऑगस्ट रोजी मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे स्टार ऐवजी फ्लाय 91 या कंपनीकडून मुंबईसाठी विमानसेवा सुरू होईल अशी बातचीत कंपनीच्या प्रतिनिधींशी सुरू आहे
उडान चा निर्णय मुख्यमंत्री घेतील
समोर दिनांक 9 जून रोजी उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानसेवा संदर्भात पुढील काही गुड न्यूज जाहीर करतील सोलापूरकरांना दिलासा देणारी बातमी देतील उडान योजनेतून विमान सेवा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत असे पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले
वेळापत्रक असे विमानसेवेचे
सोमवार व शुक्रवार : गोवा येथून सकाळी सात वाजून वीस वाजता सोलापूरकरांसाठी विमान उड्डाण घेईल त्यानंतर साडेआठ वाजता सोलापूर विमानतळावर विमान उतरेल सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटाला सोलापूरहून विमान गोव्याकडे उडान होईल दहा वाजून पंधरा मिनिटांनी गोवा विमानतळावर विमान उतरणार आहे.
शनिवार व रविवार : गोवा येथून चार वाजून पाच मिनिटांनी सोलापूर साठी विमान उड्डाण घेईल पाच वाजून दहा मिनिटांनी सोलापुरात विमान उतरणार आहे त्यानंतर पाच वाजून 35 मिनिटांनी सोलापुरातून विमान उड्डाण घेईल व सहा वाजून पन्नास मिनिटाला गोव्यात किमान उतरेल.
0 Comments