Hot Posts

6/recent/ticker-posts

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या अंबाजोगाई तालुक्यातील घटना पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल

 सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या अंबाजोगाई तालुक्यातील घटना पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल


बीड: अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथील 26 वर्षीय विवाहतिने सासरच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक ५ रोजी घडली .या प्रकरणी सासरच्या चार जणांसह भाजप तालुका अध्यक्षावर बर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो मयत विवाहितेच्या पतीचा मित्र असून घटनेनंतर फरार झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुभांगी संतोष शिंदे राहणार गीत्ता तालुका अंबाजोगाई असे त्या मृत विवाहातीचे नाव आहे याप्रकरणी मृतविवाहितेचा भाऊ प्रदीप रुत्सुम सोळुंके राहणार मोहखेड तालुका धारूर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभांगीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शुभांगी चा तिच्या सासरच्या लोकांनी ऑप्टिकल दुकान सुरू करण्यासाठी तिच्या माहेरकडून सातत्याने पैशाची मागणी केली माहेरच्यांनी यापूर्वी पाच लाख रुपये दिले होते मात्र आणखी चार लाख रुपयासाठी शुभांगी वर मानसिक दबाव आणण्यात येत होता .या सततच्या छळाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतला या प्रकरणी पती संतोष शिंदे ,सासरे विलास शिंदे ,सासू सुमन शिंदे ,नणंद सीमा शिंदे आणि पतीचा मित्र संदीप काचगुंडे यांच्या विरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीसह सासू-सासरे आणि नणंद या चौघांना पोलिसांनी अटक केली असून संदीप काचगुंडे हा अद्याप  फरार आहे तो भाजपचा धारूर तालुकाध्यक्ष असून त्याच्या फरार होण्यात राजकीय पाठबळ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे बर्दापूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे संदीप काचगुंडे याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments