Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी मंत्री तानाजी सावंत यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर-Tanaji Sawant

माजी मंत्री तानाजी सावंत यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर  


धाराशिव दि,२९ प्रतिनिधी रूपेश डोलारे :    राज्याचे  माजी आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार  तानाजी सावंत  यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे माहिती मिळत आहे.  तानाजी सावंत  यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आमदार तानाजी सावंत यांना दि,२८ रोजी  दुपारी सुमारे ४.३० वाजता चक्कर येऊन उलटी झाल्यामुळे हृदयाची धडधड वाढली. यावेळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी हृदयाचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयात तानाजी सावंत यांना दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये तानाजी सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी केलेल्या तातडीच्या उपाचारांमुळे तानाजी सावंत यांची प्रकृती थोडी स्थिर होत असल्याचे सांगितले जात आहे. आज तानाजी सावंत यांच्या महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे म्हटले जात आहे. तूर्तास तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रुग्णालयात प्रथम त्यांची आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तपासणी केली व त्यांना पुढील उपचार व निरीक्षणासाठी रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोग तज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट आणि सहकारी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या त्रास होण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या देखील करण्यात येत आहेत.

रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सावंत यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयाकडून योग्य ते उपचार व देखरेख करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments