पिक विमा पोटी शेतकऱ्यांना लवकरच 379 कोटीची भरपाई मिळणार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : सर्व समावेशक पीक विमा(pikvima) योजनेअंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटींची रक्कम विमा कंपनी(insurance company) मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 च्या विमा हप्त्यासाठी एक हजार 29 कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचही त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2024 साठी आतापर्यंत तीन हजार 907 कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले. असून यासाठीचे 3561 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाई पोटी 346 कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित होती याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता या प्रस्तावास विविध विभागाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. आता पीक कापणी प्रयोग(pik kapni prayog) आधारित नुकसान भरपाई व पाणी पश्चात नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा होतील याबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास कृषी विभागाशी(Agreeculture Department) संपर्क साधण्याचे आव्हान कोकाटे यांनी केली आहे.
0 Comments