Hot Posts

6/recent/ticker-posts

वसंतराव नाईक यांची शाश्वत पाण्याची संकल्पना राबविणे काळाची गरज - प्रा सचिन चव्हाण

वसंतराव नाईक यांची शाश्वत पाण्याची संकल्पना राबविणे काळाची गरज - प्रा सचिन चव्हाण 


प्रतिनिधी रुपेश डोलारे दि.१ :येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित रामकृष्ण महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावेळी नॅक समन्वयक डॉ संदिप देशमुख यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशिलादेवी यांच्या पुतळ्याचे, तसेच वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.सदर प्रसंगी कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले,पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी हा जगला पाहिजे ही त्यांची तळमळ होती, त्यासाठीं त्यांनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल आणि प्रयोग केले, महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सर्वप्रथम त्यांनीच सुरू केली,आज नविन  शेतकरी तरुणांनी विकसित शेतीसाठी वसंतराव नाईक यांचा आदर्श घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी तर आभार डॉ बालाजी गुंड यांनी मानले यावेळी महाविद्यालयाचे प्रबंधक सुमेर कांबळे यांची उपस्थिती होती,सदर कार्यक्रम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments