कावीळ झाल्याने मांत्रिकांचे मंतरलेले तेल पाजले महिलेचा मृत्यू; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
अहिल्यानगर : अंधश्रद्धेच्या विळख्यात आणखी एक बळी गेल्याची धक्कादायक घटना अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात उघडकीस आली आहे. कावीळ झालेल्या महिलेला उपचाराऐवजी मंतरलेले तेल पाजल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबंधित मांञीक चर्च फादरवर महाराष्ट्र जादूटोणा आणि आघोरीकर्ते प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी प्रभागात राहणाऱ्या वनिता विश्वनाथ हरकळवळी वय (42) यांचा संशयास्पद मृत्यू झाला महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार वनिता यांना कावीळ झाल्याचे डॉक्टरांनी निदान केली होती; मात्र उपचार ऐवजी तिला एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून मंतरलेले तेल पाजण्यात आले संजय जीवन पंढरी वय (49) राहणार काळे वस्ती मारुती मंदिराजवळ खडकी सध्या राहणार खेड शिवापुर जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे.की समता नगर चर्चेचे फादर चंद्रशेखर गौडा राहणार बागुल वस्ती कोपरगाव यांनी वनिता यांना काही आजार नाही तिला बाहेरून काही झाले आहे औषधाने थोडाही फरक पडणार नाही असे सांगून मंतरलेली पॅराशुट तेल दिले फादरने त्या तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र मारले, पाणी शिंपडले आणि त्या बाटलीतील तेल कपाळावर लावून त्रास वाढल्यास प्यावी असे सांगितले. वनिता यांनी तसे केल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडली वनिता यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना प्रवरा लोणी येथील रुग्णालया दाखल करण्यात आले. मात्र दोन ते तीन दिवस उपचार करूनही त्यांना वाचवता आले नाही त्यांचा मृत्यू झाल्यानंतर भावाने तक्रार दिली या निष्काळजीपणामुळे व बेजबाबदार वर्तनामुळे आपली बहीण मरण पावल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस आणि महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत फादरगौडा याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहोत.
0 Comments