तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी भिगांरदेवे यांचा सत्कार
तुळजापूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे - पंचायत समिती तुळजापूर येथे नुकतेच पदभार स्वीकारलेले गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री हेमंत भिंगारदेवे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार तुळजापूर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला यावेळी गट विकास अधिकारी हेमंत भिगांरदेवे यांनी प्रथम त्यांनी तुळजापूर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार ग्रामपंचायतीचा पाच टक्के निधी या विषयांवर चर्चा केली व त्यांनी असेही सांगितले की ज्या ग्रामपंचायतच्यां मिळकत करातील दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च करत नसतील तर मला कळवावे असे हि यावेळी बोलताना सांगितले तसेच लवकरात लवकर निधी खर्च करण्याचे नियोजन करु व तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालय येथिल दिव्यांग बंधु भगिनीं या निधी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ अशा वेगवेगळ्या विषयांवर गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली .
यावेळी उपस्थित श्री शशिकांत मुळे, सचिन शिंदे ,शशिकांत गायकवाड, अभिमान सगट ,पांडुरंग नाईकवाडी* *बाळासाहेब बागल ,दशरथ भाकरे ,आदी प्रहार कार्यकर्ते तसेच तुळजापूर पंचायत समिती येथिल सर्व ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी वर्ग भरपूर प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments