Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादायक : बहिणीची शाळेतील टीसी काढायला गेलेल्या भावाला शिक्षकाकडून मारहाण परस्परविरोधी गुन्हे दाखल लातूर जिल्ह्यातील घटना

धक्कादायक : बहिणीची शाळेतील टीसी काढायला गेलेल्या भावाला शिक्षकाकडून मारहाण परस्परविरोधी गुन्हे दाखल लातूर जिल्ह्यातील घटना


लातूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे: बहिणीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेलेला युवक आणि शिक्षकांत बाचाबाची होऊन हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी अहमदपूर शहरातील एका शाळेत घडली घडले आहे या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलिसात दोन्ही परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडल्यामुळे गुरु शिष्याच्या नात्याला गालबोट लागल्याचे दिसून येत आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की बुधवारी दुपारी रोहन उत्तम कांबळे राहणार इंदिरानगर अहमदपूर हा आपल्या बारावीतील बहिणीची टीसी काढण्यासाठी महात्मा फुले विद्यालयात गेला होता तेव्हा टीसी वरून त्याचा आणि शाळेतील काही कर्मचारी मुख्याध्यापक सिताराम जाधव यांच्यात वाद झाला सुरुवातीला शाब्दिक बाचा बाची झाली मात्र त्याचे रूपांतर हाणामारीत झाली. याप्रकरणी अहमदपूर पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत

रोहन कांबळे यांनी शाळेतील कर्मचारी व मुख्याध्यापकावर मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे त्याच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसात बुधवारी रात्री विविध कलमाने व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्याध्यापक सिताराम जाधव यांनी तक्रारीत म्हटली आहे सदरील युवकांनी शाळेत गोंधळ घालून कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले शासकीय कामात अडथळा निर्माण केला मला शिवीगाळ  करून मारले व त्यांनी मारहाण करून धमकी दिली याप्रकरणी अहमदपूर पोलिसात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

शाळेत बहिणीचा टीसी काढण्यासाठी गेलेल्या भावाकडून शिक्षकाने 200 रुपये मागितले.  त्यावर भावाने या पैशांसाठी पावती मागितली. त्यानंतर वाद सुरू झाला आणि या विद्यार्थिनीच्या भावाची आणि शिक्षकाची चांगलीच हाणामारी झालेली बघायला मिळाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून त्यानंतर या शिक्षकांवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

अहमदपूर पोलीस तपास करीत आहेत

अहमदपूर आतील शाळेमध्ये टीसी काढण्यावरून शाब्दिक चकमक झाली हा वाद वाढत गेल्याने हाणामारी झाली या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments