सिंदफळ येथील मुदगुलेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त मुद्गगुलेश्वर सेवा समिती तुळजापूर यांच्या वतीने श्री पंचमुखी हनुमान अवतार महापुजा दर्शनासाठी शेकडो भाविकांची गर्दी

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: तुळजापुर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात घाटशीळच्या पायथ्याशी वसलेले सिंदफळ येथे प्राचीन मुदगुलेश्वर मंदिर आहे , अति प्राचीन श्री मुदुगुलेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येथील मंदिरात गर्भग्रहात शंभू महादेवाची मूर्ती समोर मारुती ,नागनाथसह अन्य देवी देवतांच्या मूर्ती आहेत. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे येथे शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.आज दि,२८ रोजी  मुदगुलेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त  मुद्गगुलेश्वर सेवा समिती तुळजापूर यांच्या वतीने श्री पंचमुखी हनुमान अवतार महापुजा करण्यात आली होती.

श्री मुदुगुलेश्वराला नवस बोलला की तो पूर्ण होतो अशी अख्यायिका स्थानिकांकडून, मंदिर पुजाराकडून सांगितले जाते त्यामुळे नवस्फूर्ती होताच श्री मुदुगुलेश्वरास भात शिरा, लिंपुन नवस्फुर्ती केली जाते. श्रावण महिन्यामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होतात, प्रत्येक सोमवारी येथील मंदिरात फुळे, फुलांसह आकर्षक आरास मांडण्यात येतो. सायंकाळी आरास मांडल्यानंतर महाआरती करण्यात येते.

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथे ८ ते १० हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. तुळजापूर शहरापासून काही अंतरावरील घाटशीळ उतरल्यानंतर बार्शी रस्त्यावर घनदाट झाडीतून सिंदफळ शिवारातून प्रवेश केल्यानंतर हे प्राचीन मंदिर नजरेस पडते. मंदिरासमोर मोठा ओढा वाहत असून अतिशय दाट वनराई असल्याने हा परिसर भाविकांसाठी व पर्यटनासाठी अतिशय निसर्गरम्य आहे.

Post a Comment

0 Comments