मौजे उमरगा (चि) येथील महादेव मंदिर परिसरातील अतिक्रमण ग्रामपंचायतच्या वतीने अखेर हटवले.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
सरपंच सर्वेश्वर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी जे.सी.बी.सहाय्याने पाच वर्षापासुनचे अतिक्रमण केले मोकळे
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे उमरगा (चि) येथील महादेव मंदिर परिसरात असलेले पाच वर्षांपासुन चे अतिक्रमण अखेर ग्रामपंचायतच्या अथक परिश्रमाने शुक्रवार दि.२५ जुलै २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच हटवले गेले असल्याने गाव परिसरातून सरपंच सर्वेश्वर पाटील व त्यांचे सर्व सहकाऱ्यांसह ग्रामपंचायतचे कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.
उमरगा चि.येथील महादेव मंदिर परिसरात संबंधित व्यक्तींनी लोखंडी पाईप व अँगलचे शेड उभे केले होते. वेळोवेळी सांगून ही केलेले अतिक्रमण काढले जात नव्हते म्हणून सरपंच सर्वेश्वर पाटील, महादेव वडजे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने नोटीस ही दिली मुख्यमंत्री यांना निवेदन दिले तहसील कार्यालय येथे ही संबंधित अतिक्रमण विषयी सुनावणी ही झाली पण कसलीच कार्यवाही करण्यात आली नाही. येथील महादेव मंदिर परिसर हे पूर्व पश्चिम ३१ व दक्षिण उत्तर ४० या जागेत स्थापित आहे.संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार देऊन ही केलेले अतिक्रमण काढले जात नसल्याने अखेर ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेऊन सरपंच सर्वेश्वर पाटील यांनी ग्रामपंचायतच्या वतीने श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जे.सी.बी.च्या सहाय्याने पाच वर्षांपासुन असलेले महादेव मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवले. हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून सर्वेश्वर पाटील महादेव वडजे प्रयत्नशील होते अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
हे अतिक्रमण हटवण्यासाठी सरपंच सर्वेश्वर पाटील, महादेव वडजे, केतन वडजे, शंकर सुरवसे, तुकाराम वडजे, सुरज वडजे, तानाजी सावंत, राजेंद्र सावंत, राम कदम, विवेक सावंत, परिक्षीत साळुंके, गजानन कुलकर्णी, , शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी, हिंदू राष्ट्र संघटना, तरुण शिवभक्त. व ग्रामपंचायतने परिश्रम घेतले. उमरगा चि. येथील ग्रामपंचायतने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक गाव परिसरातून केले जात आहे.
0 Comments