हरित धाराशिव अभियान अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे ६००० वृक्ष लागवडीचे नियोजन
तुळजापूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे : जिल्ह्यामध्ये वृक्षाचे प्रमाण वाढावे जिल्हा वृक्षांनी आच्छादित व्हावा व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या 19 जुलै रोजी जिल्ह्यातील 294 ठिकाणच्या 5 हजार 702 आर क्षेत्रावरील 15 लक्ष विविध वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी हरित धाराशिव महोत्सव म्हणजेच वृक्ष लागवड हा सृष्टीचा सोहळा साजरा करावा अशी आव्हान जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे नागोबा मंदिर परिसरात हरित धाराशिव अभियान अंतर्गत उद्या 19 जुलै रोजी ६००० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असे सरपंच युवराज बागल ग्राम सेवक लाट कर ,तलाठी शिंदे, कृषी सहाय्यक गोरे यांनी आव्हान केले आहे.
![]() |
| ग्रामपंचायत कडून वृक्ष लागवडीची तयारी सुरू |


0 Comments