भूम : लग्नाचे आमिष दाखवून साडेसात वर्षापासून महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल
धाराशिव: मागील जवळपास साडेसात वर्षापासून सातत्याने लग्न करण्याचे आमिष दाखवत एका 35 वर्षीय महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना भूम तालुक्यात घडली आहे शिवाय आरोपी तरुणांनी पिडीतिचे 15 तोळे सोने ही लुबाडल्याची तक्रार 27 जुलै रोजी महिलेने दिलेल्या भूम ठाण्यात आली आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की भूम पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका आरोपी तरुणाने गावातीलच 35 वर्षे महिलेसोबत सुमारे साडेसात वर्षापूर्वी संबंध जुळवले होते या महिलेस तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगत विविध आमिषे दाखवून आरोपीने 24 नोव्हेंबर 2017 ते 22 जुलै 2025 या कालावधीमध्ये घरातून बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केला शिवाय या महिलेकडून त्यांनी जमिनीत हिस्सा देण्याची थाप मारून तिच्याकडून 15 तोळे सोन्याची दागिने काढून घेतले. यानंतर मात्र तो परत कसलीच परतफेड करत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने 27 जुलै रोजी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे याप्रकरणी त्यानुसार पोलिसांनी आरोपी तरुणावर लैंगिक अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जमिनीत हिस्सा देण्याचे आमिष अन् पाच लाखाचे सोने लुबाडले
पीडित महिलेला आरोपी तरुणाने भूम शहरातील आयटीआय महाविद्यालय जवळ घेतलेल्या जमिनीत हिसात देण्याची अमिष दाखवले होते या पोटी महिलेकडून त्यांनी पाच लाख एकोणीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीच 149 ग्रॅम सोने घेतली होती यानंतर त्या तरुणाने ना सोने परत केले ना जमीन हिस्सा दिला त्यामुळे या महिलेला आपली फसून झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भूम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचार व फसवणुकीचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments