Hot Posts

6/recent/ticker-posts

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, पाच तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल-Dharashiv News

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, पाच तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल-


धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : अल्पवयीन तरुणीवर चाकूचा धाक दाखवून व लैंगिक अत्याचार, मारहाण केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील एका गावात घडली आहे याप्रकरणी आंबी पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात घरासमोरील अंगणात झोपलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवार, (दि.१४ जुलै) रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंबी पोलीस ठाण्यात चार ते पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित मुलगी आपल्या घरासमोरील अंगणात झोपली होती. त्यावेळी गावातीलच चार ते पाच तरुण तिथे आले आणि तिला जबरदस्तीने घरापासून जवळपास २०० मीटर अंतरावर घेऊन गेले. तिथे एका तरुणाने तिच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या वेळी इतर तरुणांनी पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीचा आरडाओरडा ऐकून तिची आई तिला वाचवण्यासाठी धावत आली असता, आरोपी तरुणांनी तिच्या आईलाही मारहाण करून जखमी केले.

या घटनेनंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ११५(२), १९१(२) (३), १९० यासह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments