ऑनलाइन चक्री गेमच्या नादात तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या लातूर जिल्ह्यातील घटना,
लातूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे : शहरात नव्हे तर खेड्यापाड्यातही ऑनलाइन गेम खेळण्याची प्रमाण वाढले आहे ऑनलाइन चक्री गेम मध्ये सातत्याने पैसे गमवावे लागल्यान एका तीस वर्षे तरुणानी गळफास घेऊन जीवन संपवण्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की महेश राम यादव वय 30 असे मृताचे नाव असून तो औसा तालुक्यातील बोरफळ या गावचा रहिवासी होता त्याला गेल्या काही दिवसापासून ऑनलाईन चक्री गेम खेळण्याचा छंद लागला होता यामध्ये कधी त्याला चार पैसे मिळत होते तर अधिक वेळा पैसे गमावे लागत होते या गेम बाबत तो जास्त बोलत नव्हता पण गरज पडली की मित्र परिवाराकडून ऑनलाइन द्वारे पैसे मागत होता नळेगाव येथील एका खाजगी हॉटेलमध्ये दिवसभर वत्साद म्हणून काम करीत होता; तर रात्री तेथेच झोपत असे नळेगाव येथील आराध्या इटली सेंटर मध्ये कामाला येण्यापूर्वी महेश चे स्वतःचे अष्टामोड येथे हॉटेल होते पण या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर त्याला हॉटेल बंद करावी लागली होती त्यामुळे नळेगाव येथे कुटुंबास कामाला आला होता.
पत्नी गरोदर असल्यामुळे पत्नी व मुलीला गावाकडे पाठवून तो एकटाच येथे राहत होता दिनांक 18 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे हॉटेल चालक राहुल हेरकर हॉटेल उघडण्यापूर्वी आले असता महेशनी गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले पोलिसांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगाव येथे शवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला मयत महेश यादव च्या पश्चात आई-वडील पत्नी एक मुलगी भाऊ असा परिवार आहे या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे अंमलदार श्रीकृष्ण स्वामी शिरीष नागरगोजे शत्रुघन शिंदे हे करत आहेत.
ऑनलाइन गेम छंद जीवावर घेतला
बऱ्याच दिवसापासून महेश हा ऑनलाइन गेम खेळत होता यासाठी त्याला नेहमी ऑनलाईन पैशाची गरज भासत होती गुरुवारी दिनांक 17 रोजी रात्रीही महेशने मला अर्जंट काम असल्याचे सांगून एक जनाकडून ऑनलाइन पैसे घेतले होते तसेच हॉटेल मालक राहून यांच्याकडून दोन हजार रुपये घेतले होते ऑनलाईन गेम मध्ये नुस्कान झाल्यामुळे महेश ने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
0 Comments