धाराशिव : ऑनलाईन आर्थिक फसणुक झालेली एकुण रक्कम 3,30,949 ₹ पाच जणांना परत, धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी- Cyber Police Dharashiv

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : ऑनलाईन आर्थिक फसणुक झालेली एकुण रक्कम 3,30,949 ₹ पाच जणांना परत, धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी- Cyber Police Dharashiv

धाराशिव : ऑनलाईन आर्थिक फसणुक झालेली एकुण रक्कम 3,30,949 ₹ पाच जणांना परत, धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी- Cyber Police Dharashiv


धाराशिव/प्रतिनिधी -रूपेश डोलारे  : जिल्ह्यामध्ये ऑनलाइन  आर्थिक फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे, हे ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यात धाराशिव सायबर पोलिसांना यश आले आहे जिल्ह्यातील पाच नागरिकांना ऑनलाइन आर्थिक फसवणूक झालेली रक्कम  तीन लाख तीस हजार 949 रुपये परत करण्यात आले आहेत.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे धाराशिव जिल्ह्यातील फिर्यादी नामे- श्री. आशा सोमनाथ शिंदे, रा. विश्वास नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, श्री. शोएब नरिरुद्दीन नाईकवडी रा. शिरीन कॉलनी ता. जि. धाराशिव, श्री. नितीन भास्कर घुगे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव, श्री. मारुती सोमनाथ कोकरे, रा. शिवशंकर नगर ता. भुम जि. धाराशिव व श्री. स्वप्निल कुंडलिक कुंभार रा. समतानगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्यांची अनुक्रमे 40,000₹,18,000₹,1,08,000₹,99,000₹ व 65,000₹अशी एकुण 3,30,949 ₹ ची ऑनलाईन आर्थिक फसवणुक झालेबाबत एनसीसीआर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सायबर पोलीसांनी तात्काळ संबंधित बॅक, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व पेमेंट गेटवेंशी पत्रव्यवहार करुन आरोपींच्या विविध बॅक खात्यात वर्ग झालेले सर्व बॅक खाते गोठविले होते. त्यानंतर सायबर पोलीसांनी संबंधित बॅकांच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करुन फसवणुक झालेली रक्कम 3,30,949₹ फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्रीमती. रितू खोखर सो. व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. शफकत आमना सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चोरमले, सपोनि कासुळे, सफौ कुलकर्णी, पोहक. ११२९ /हालसे, मपोना ५३ / पौळ, पोशि १०३६ / जाधवर, पोशि १७७७ / भोसले, पोशि १८१७ / मोरे, पोशि २६३ / तिळगुळे, पोशि १६०९/ कदम, पोशि ८५ / काझी, मपोशि ७१८ / शेख, मपोशि १६६९ / खांडेकर, पोशि ९७१ / शिंदे, पोशि १२६ / पुरी, पोशि १८९४ /अंगुले पोशि १६५ / बिराजदार व पोशि ८० / गाडे यांनी केली आहे.

सायबर पोलीस ठाणेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन

कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज / लिंक / फोन / क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी फोनद्वारे देउ नये किंवा लिंकवर क्लिक / क्यू आर कोड स्कॅन करू नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्प लाईन क्र. 1930 वर कॉल करून सायबर गुन्हयाची माहिती दयावी किंवा www.cybercrime.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे तात्काळ संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments