श्री तुळजाभवानी मातेचे आजपासून १० दिवस दर्शन बंद राहणार, मुखदर्शन, धार्मिक विधी सुरळीत राहणार-Shri Tuljabhavsni mata

Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री तुळजाभवानी मातेचे आजपासून १० दिवस दर्शन बंद राहणार, मुखदर्शन, धार्मिक विधी सुरळीत राहणार-Shri Tuljabhavsni mata

श्री तुळजाभवानी मातेचे आजपासून १० दिवस दर्शन बंद राहणार, मुखदर्शन, धार्मिक विधी सुरळीत राहणार-


तुळजापूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे: तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे श्री तुळजाभवानी मातेचे धर्मदर्शन व पेड दर्शन १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थांकडून कळवण्यात आले आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या स्वनिधीतून  विकास कामे सुरू आहेत त्यामुळे सिंहासनाच्या गाभाऱ्यात पुरातत्त्व खात्यामार्फत १ ऑगस्ट ते १० ऑगस्टपर्यंत जीर्णोद्धाराचे काम पार पडणार आहे त्यामुळे या काळात धर्मदर्शन व पेड दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आली आहे. तसेच यावेळी इतर धार्मिक विधी सिंहासन पूजा अभिषेक पूजा व मुखदर्शन हे मात्र नियमितपणे चालू राहणार असल्याचे मंदिर संस्थाने कळवले आहे याबाबत सर्व महंत पुजारी सेवेकरी व भाविक यांनी नोंद घ्यावी अशी आव्हान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments