डी-फार्मसीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, मोबाईल व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी ठेवला अन् उचलला टोकाच पाऊल -छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना

Hot Posts

6/recent/ticker-posts

डी-फार्मसीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, मोबाईल व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी ठेवला अन् उचलला टोकाच पाऊल -छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना

डी-फार्मसीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, मोबाईल व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी  ठेवला अन् उचलला टोकाच पाऊल -छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना,


छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे  : गावाकडून शिक्षणासाठी शहरात आलेल्या डी फार्मसी च्या तिसऱ्या सत्राचे शिक्षण घेणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणी परमेश्वर वायाळ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे  आहे..

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील मूळ मंठा तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी कुटुंबातील कल्याणी परमेश्वर वायाळ ही तरुणी गावाकडून डी फार्मसी च्या शिक्षणासाठी शहरात आली होती काही महिन्यापासून शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास होती .साई इन्स्टिट्यूट मध्ये ती डी फार्मसी च्या तिसऱ्या सत्राचे शिक्षण घेत होती वर्ग मैत्रीण सोबत ती N-7  च्या ग्रीव्हेल कॉलनीत राहत होती बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे सर्व मैत्रिणींनी मिळून स्वयंपाक केला मैत्रिणी डबा घेऊन महाविद्यालयात गेली. कल्याणी मात्र घरीच थांबली होती दुपारी मैत्रिणी घरी परतल्यावर कल्याणी दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता कल्याणी लटकलेले अवस्थेत आढळले ही घटना बुधवारी दुपारी एक वाजता महाविद्यालयात गेलेल्या मैत्रिणी खोलीवर परतल्यानंतर N-7  परिसरात ही घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी सहकार्य सहभाग घेतली स्थानिकाच्या मतीने कल्याणी चा मृतदेह खाली उतरवून घाटी रुग्णाला दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

रूम मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या पोझिशनमध्ये मोबाईल

पोलिसांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला तेव्हा कल्याणीचा मोबाईल समोर एका फळीवर उभा अवस्थेत होता कदाचित व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ कॉल करण्याच्या अवस्थेत तो मोबाईल ठेवण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मात्र तो मोबाईल लॉक असल्याने फॉरेन्सिक विभागाच्या तपासणीनंतरच नेमका प्रकार समोर येईल अशी पोलिसांनी सांगितले.

अनुभवासाठी मेडिकलवर काम

शेतकरी कुटुंबातून आलेल्या कल्याणीला औषध क्षेत्रात शिक्षण घ्यायचे होते. शिक्षण सुरू असतानाच अनुभवासाठी ती सिडको परिसरातील एका मेडिकलमध्ये देखील काम करत होते वीस दिवसापूर्वीच ती कुटुंबाला भेटण्यासाठी गावाकडे गेली होती तिला दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments