Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुर: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार--Solapur: Minor girl raped on the pretext of marriage

सोलापुर: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन  मुलीवर बलात्कार--


सोलापुर/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : महाविद्यालयात शिकत असताना फिरावयास नेऊन लग्नाचे आमीष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार  अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित अल्पवयीन तरुणी ही शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकत असताना आरोपी हा कॉलेजमध्ये येत होता ओळख वाढवत त्यांनी एकदा पिडीत तरुणी कडून मोबाईल नंबर मागितला आणि नंतर त्यांचे व्हाट्सअप वर चॅटिंग बोलणे सुरू केले त्यातून दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध झाले त्यानंतर त्यांनी पीडित अल्पवयीन तरुणीला गाडीवर बसून अनेक ठिकाणी फिरवले. हैदराबाद रोड वरील एका लॉज मध्ये नेऊन त्यांनी पहिल्यांदा बलात्कार केला. लग्नाबद्दल विचारणी केली असता शिक्षण झाल्यानंतर पुढे बघू अशी पिडीता त्याला सांगितले ही घटना घरच्यांना कळल्यानंतर पीडित तरुणीने तेथील घर सोडून ती दुसरीकडे राहायला गेली त्यानंतर पुन्हा मार्च 25 मध्ये त्यांच्यात बोलणे सुरू झाले त्यांनी पुन्हा तिला फिरवयास घेऊन हैदराबाद रोडवरील त्या लॉज मध्ये घेऊन गेला आणि पुन्हा अत्याचार केले त्यानंतर मात्र त्यांनी लग्न करण्यासाठी  टाळाटाळ  व बोलणे सोडले ही घटना आई-वडिलांना समजल्यानंतर पीडित तरुणीने आईसमवेत जोड भावी पेठ पोलीस ठाण्यात आरोपी यांच्या विरोधात फिर्यादी दिली असून  त्याच्यावर पोस्को अंतर्गत कलमा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments