2017 पासून हरवलेला मुलगा अखेर आई-वडिलांच्या स्वाधीन, बीड पोलिसांच्या संवेदनशील कामगिरीचे कौतुक-Beed police missing case boy return

Hot Posts

6/recent/ticker-posts

2017 पासून हरवलेला मुलगा अखेर आई-वडिलांच्या स्वाधीन, बीड पोलिसांच्या संवेदनशील कामगिरीचे कौतुक-Beed police missing case boy return

 2017 पासून हरवलेला मुलगा अखेर आई-वडिलांच्या स्वाधीन, बीड पोलिसांच्या संवेदनशील कामगिरीचे कौतुक-Beed police missing case boy return


बीड /प्रतिनिधी -रूपेश डोलारे : शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा दहावीला असताना रागाच्या भरात 2017 साली निघून गेला त्यानंतर 2023 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला परंतु पोलिसांना सापडत नव्हता दोन दिवसापूर्वी तो पुण्यात असल्याचे समजतात पोलिसांनी शोध घेत त्याला बीडला आणले त्यानंतर आई-वडिलांना शुक्रवारी दिनांक 8 रोजी तपासात मदत हवी आहे म्हणून बोलवुन घेतले पोलीस अधीक्षकासमोर चर्चा सुरू असतानाच मुलाला समोरून आणत असल्याचे दिसले यावेळी मुलासह सर्वच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. माय लेकरांनी एकमेकांना पाहताच आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला मिठीत घेत आनंद अश्रूंना वाट मोकळी करून दिली तर मुलाच्या वडिलांनीही त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवलेच शिवाय मुलाला परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत अप्पर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह पथकाचे विनम्रतेने आभार मानले.

या घटनेची अधिक माहिती अशी की राजू काकासाहेब माळी हा मुलगा सन 2017 साली तो सोळा वर्षाचा असताना घरातून निघून गेला होता तो तेव्हा नाळवंडी येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता आई-वडिलांनी आर्थिक परिस्थिती जेमतेम त्यामुळे ते ऊस तोडी करण्यासाठी कर्नाटक राज्यात होते असे असतानाच डिसेंबर 2017 मध्ये राजू हा शाळा सुटल्यावर कोणाला काही येत न सांगता निघून गेला. आई-वडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटकहून गावी येण्यास आठ दिवस लागले. राजू काही दिवसात परत येईल अशी आशा त्यांना होती त्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल केला नाही पाच ते सहा वर्षे निघून गेले पण राजू परत आलाच नाही अखेर 2023 मध्ये त्याचे आईने पिंपळनेर पोलीस  ठाण्यात राजू हरवल्याची तक्रार दाखल केली नंतर जानेवारी 2025 हा गुन्हा अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाला होता.

अनेक तांत्रिक तपास, चौकशी  केल्यानंतर राजूची लोकेशन पुणे येथे असल्याचे समजले पोलिसांनी त्याला शोधून विश्वासात घेऊन बीडला आणले ही माहिती त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांना देण्यात आली त्यांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आली मुलगा सुखरूप परततो ही भावनाच आई-वडिलांना स्वर्गाहून सुंदर वाटत होती पथक त्याला बोलवून घेऊन पोलीस अधीक्षक यांच्या केबिनमध्ये येताच आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला मिठीत घेत मायेने कुरवाळी वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आणि सारे नातेवाईक धायधाय रडू लागले मुलगा मिळाल्याचा हा अति आनंद होता यावेळी उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि पथकातील अधिकारी सद्गतीत झाले होती.

पोलिसांच्या संवेदनशील कामगिरीचे कौतुक

बीड पोलिसांच्या या संवेदनशील कामगिरीचे कौतुक होत असून त्यांनी फक्त एका मुलाचा शोध घेतला नाही तर मुलगा परत येईल म्हणून वाट पाहणारे आई-वडिलांचा आत्मविश्वास सार्थ ठरवून दिल्याची भावना व्यक्त होत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटी वाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पल्लवी जाधव, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर ,पोलीस हेडकॉन्स्टेबल असिफ शेख, आनंद मस्के ,हेमा वाघमारे, उषा चौरे , प्रदीप येवले अशोक शिंदे ,पोलीस नाईक अर्जुन यादव ,पोलीस शिपाई प्रदीप वीर ,योगेश निर्धार यांनीही कामगिरी पार पाडली.

शिक्षणाचा कंटाळा आला आणि रागाच्या भरात

राजू काकासाहेब माळी वय 24 राहणार खळवट लिमगाव तालुका वडवणी असे या मुलाचे नाव आहे त्यांच्या आई वडील ऊसतोड कामगार आहेत त्याला शिक्षणासाठी नाळवंडी तालुका बीड येथे ठेवले होते 2017 साली तो शिक्षणाला कंटाळा आणि रागाच्या भरात निघून गेला नातेवाईकांनी ही सहा वर्षे शोध घेतला पण तो मिळून आला नाही त्यामुळे पिंपळनेर पोलीस ठाण्यात 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता तो पुण्यात असल्याचे समजतात गुन्हे शाखेच्या पथकाने शोधून आणली.

Post a Comment

0 Comments