उमरगा येथे २३ वर्षीय तरुणाचा खून ,तीन महिलांना अटक, महिला कालिका कलाकेंद्रातील असल्याची माहिती-Umerga Police Station Murder Case

Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा येथे २३ वर्षीय तरुणाचा खून ,तीन महिलांना अटक, महिला कालिका कलाकेंद्रातील असल्याची माहिती-Umerga Police Station Murder Case

उमरगा येथे  २३ वर्षीय तरुणाचा खून ,तीन महिलांना अटक, महिला कालिका कलाकेंद्रातील असल्याची माहिती


धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : उमरगा शहरातील मुन्शी प्लॉट येथील एका 23 वर्षीय बेपत्ता तरुणाचा शहराच्या बाह्य वळण रस्त्यावरील आरती मंगल कार्याजवळ संशयास्पद मृत्यू झाल्याच्या समोर आले या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी शनिवारी दिनांक 9 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी तीन महिलांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,उमरगा पोलिस (Umerga police Station) ठाण्याच्या हद्दीत, दि. २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:०० ते दि. २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:३० या कालावधीत, बायपास रोडलगत अंकुश शिंदे यांच्या शेताजवळ अभिषेक कालिदास शिंदे (वय २३, रा. मुन्शी प्लॉट, उमरगा) याचा खून झाला. आरोपी सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि नीता जाधव (सर्व रा. उमरगा) यांनी संगनमताने हा खून केल्याचा आरोप आहे. अभिषेकचे वडील कालिदास संभाजी शिंदे (वय ५४) यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी भा.दं.वि. (BNS)१०३(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वडिलांच्या जबाबानुसार पंधरा दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल

उमरगा शहरातील मुन्शी प्लॉट येथील कालिदास शिंदे यांनी आपला मुलगा अभिषेक शिंदे हा दि, 24 जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी उमरगा पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्याच रात्री उशिरा पोलिसांना बायपास रस्त्यालगत आरती मंगल कार्याजवळ नाल्यात अभिषेक याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता दरम्यान याप्रकरणी दिनांक 26 जुलै रोजी अभिषेक याचे वडील कालिदास शिंदे यांनी आपल्या मुलाचा घातपात झाला असून संशयतावर कारवाई करण्याची मागणी केली होती या प्रकरणी प्रारंभ पोलिसांनी कालिदास शिंदे यांचा जबाब घेऊन अकस्मित मृत्यूची नोंद केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता मात्र डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवाल प्राप्त नसल्याने पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला होता नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी या प्रकरणात लक्ष घालत फिर्यादी कालिदास शिंदे यांच्या जबाबानुसार अखेर दिनांक 9 ऑगस्ट रोजी तीन महिलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला कालिका कला केंद्र येरमाळा येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे करीत आहेत.

आरोपी महिला या कालिका कला केंद्रातील

अभिषेक शिंदे या तरुणाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला या येरमाळा येथील येरमाळा चोराखळी या कला केंद्रात नाचकाम करत पुरुषांना जाळ्यात ओढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या कला केंद्रामध्ये आरोपी महिला काम करतात त्या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये दोन गटात तंबळ हाणामारी झाली होती. आता याच कला केंद्रातील तीन महिलांना खून प्रकरणात अटक केल्याने पुन्हा एकदा हे कालिका कला केंद्र चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments