घरकुल हप्तासाठी ८ हजाराची लाच घेताना महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात -ACB catches female Gram Sevak while accepting bribe of Rs 8,000 for housing installment

Hot Posts

6/recent/ticker-posts

घरकुल हप्तासाठी ८ हजाराची लाच घेताना महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात -ACB catches female Gram Sevak while accepting bribe of Rs 8,000 for housing installment

घरकुल हप्तासाठी ८ हजाराची लाच घेताना महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात 


परभणी /प्रतिनिधी रूपेश डोलारे : तक्रारदार आणि त्याच्या आईच्या नावे मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांना देण्यासाठी परभणी तालुक्यातील किनोळा येथील ग्रामसेविकांनी आठ हजार रुपयाची लाच घेतली आहे याप्रकरणी येथील लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाने बुधवार दि, 20 रोजी कारवाई केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती

या घटनेबाबत दिलेली अधिक माहिती अशी की 34 वर्षीय तक्रारदार  लाभार्थ्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागांकडे तक्रार केली होती तालुक्यातील किन्होळा ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी आम्रपाली लक्ष्मण काकडे यांच्या विरोधात सदर तक्रार देण्यात आली होती ; यात तक्रारदार आणि त्यांच्या आईच्या नावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आली आहे. घरकुलाचा पहिला हप्ता प्रत्येकी 15000 रुपये असे ३० हजार रुपये जुलै महिन्यात त्यांच्या बँक खात्यावर जमा झाला होता. तक्रारदार यांनी घरकुलाची काम सुरू करण्याची अनुषंगाने आवश्यक असणारे कागदपत्राची फाईल घेऊन ग्रामविकास अधिकारी काकडे यांच्याशी 14 ऑगस्ट रोजी  संपर्क केला यावेळी त्यांनी योजनेतील दुसऱ्या हप्त्याची विचारणा केली त्यांच्याकडे काकडे यांनी तक्रारदार यांना संपूर्ण फाईल तयार करून एका फाईलचे पाच हजार रुपये याप्रमाणे दोन फाईलचे एकूण दहा हजार रुपये लागतात असे सांगून लाचेची मागणी केल्याची माहिती  एसीबीना दिली तक्रारदार यांनी  सोमवार दिनांक 18 रोजी एसीबीच्या विभागाने पडताळणी केली यावेळी काकडे यानी तक्रारदारांशी केलेल्या तडजोडीअंती व्यक्ती 4 हजार रुपये याप्रमाणे दोन फाईलचे आठ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची समोर आली.

 पडताळणी  नंतर बुधवार दिनांक 20 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान ग्रामसेविका आम्रपाली लक्ष्मणराव काकडे यांनी शहरातील कारेगाव रोड परिसरातील त्यांच्या घरी तक्रारदाराकडून 8000 रुपयाची लाच स्वीकारली यावेळी लाचेच्या रकमेसह त्यांना ताब्यात घेण्यात आले.या कारवाईदरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत घरझडतीसह  गुन्हा करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक महेश पाटणकर ,पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी, मनीषा पवार ,रविंद्र भूमकर, सीमा साठे, कल्याण नागरगोजे,  राम घुले ,शेख जिब्राहिम ,नरवाडे व लहाडे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments