अहिल्यानगर : शेवगाव शहरातील तरुणाचा खुनाचे गुढ उलगडले, शिकारीच्या वादातून खून, १२ तासाच्या आत २ आरोपीला ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई-
अहिल्यानगर: ठाकूर पिंपळगाव शेवगाव(Thakur pimlagaov) येथील उसाच्या शेतात सापडलेल्या तरुणाच्या कोणाचे गुड उलगडले आहे शिकारी गेल्यानंतर झालेल्या वादातून सहकार्यानेच डोक्यात लोखंडी गंज घालून खून केल्याचे उघड झाली या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या(Local Crime Branch) पथकाने दोघांना ताब्यात घेतली असून विजय चंदर किडमिंचे वय (20) अरुण लाला उपदे वय (19) (दोघे राहणार रामनगर शेवगाव जिल्हा अहिल्यानगर) अशी आरोपीचे नावे आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दि, ८ ऑगस्ट रोजी ठाकुर पिंपळगांव, ता. शेवगांव शिवारातील एका शेतामध्ये एक अनोळखी पुरुष इसमाचे प्रेत(Dead body) मिळुन आलेले होते.शेवगांव (Shevgaov) येथील मयत अनोळखी इसमाची ओळख पटवुन खुनाचे गुन्ह्यातील ०२ आरोपी १२ तासाचे आत ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई सदर घटने बाबत गोपनीय माहिती दिलेल्या खबरीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यु रजि. नंबर ९४/२०२५ भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १९४ प्रमाणे दाखल आहे.
वरील अकस्मात मृत्यु संशयास्पद असल्याने मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमुद अकस्मात मृत्युचा तपास करणेकामी विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस (LCB Police) अंमलदार हृदय घोडके, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे अशांना नेमण्यात आले होते.
पो नि किरणकुमार कबाडी यांनी वरील पथकासह घटनाटिकाणी भेट देवुन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मयत याचे डोक्यामध्ये काहीतरी हत्याराने मारहाण केल्याच्या जखमा दिसुन आल्या. पथकाने सदर घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन तसेच घटना ठिकाणचे आजुबाजुस राहणारे साक्षीदार (Witness) यांचेकडे विचारपुस केली. घटनाटिकाणी तसेच आजुबाजुस सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसल्याने मयताची ओळख पटविणेकामी अडचणी येत होत्या. पथकाने तांत्रिक कौशल्य व गुप्त बातमीदार यांचे नेटवर्कचे (Network)आधारे मिळालेल्या माहितीनुसार अनोळखी मयताचे नांव आकाश लक्ष्मण किडमिंचे वय २० वर्षे, रा. रामनगर, शेवगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर असे असल्याचे निष्पन्न केले.
मयताची ओळख पटविल्यानंतर पथकाने व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदरचा गुन्हा हा विजय चंदर किडमिंचे व त्याचा साथीदाराने केला असल्याची माहिती प्राप्त करुन त्यांचा शोध घेत असतांना १) विजय चंदर किडमिंचे वय २० वर्षे, २) अरुण लाला उपदे वय १९ वर्षे, दोन्ही रा. रामनगर, शेवगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर (Ahilyanagar) यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील इसमांकडे तपास करता त्यांनी ते तसेच मयत असे शिकारीसाठी ठाकुर निमगांव परिसरामध्ये गेल्यानंतर त्यांचेमध्ये शिवीगाळ झाल्याने त्यांनी मयत याचे डोक्यामध्ये लोखंडी गजाने मारहाण करुन त्याचा खुन केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यातील आरोपींना पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन (Shevgaov police station) येथे हजर करण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता शिकारीला गेल्याच्या कारणावरून त्याच्याबरोबर वाद झाला होता त्याच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून खून केल्याची कबुली त्या दोघांनी दिली आरोपींना शेवगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, डॉ. श्री बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग, अति. कार्यभार शेवगांव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
0 Comments