बीडमध्ये होमगार्ड महिलेची हत्या ,प्रेम प्रकरणांमध्ये अडसर ठरणाऱ्या मैत्रिणीला मैत्रिणीनेच संपवल
बीड /प्रतिनिधी रूपेश डोलारे : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात गुरुवारी दि,21 रोजी सकाळी एका होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. या अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असता एकाच बॉयफ्रेन्डच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर आली. या प्रकरणी मृत महिलेच्या मैत्रिणीसह चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अयोध्या राहुल व्हरकटे (वय २६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या ही गेवराई (Gevrai)तालुक्यातील लुखामसला येथील रहिवासी होती. चार वर्षांपूर्वीच तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. अयोध्याला तीन वर्षाची मुलगी असून ती सध्या सासरी आहे. अयोध्या काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये (Homegard women) रुजू झाली आणि पोलीस भरतीची तयारी करत होती. त्यासाठी ती बीड शहरातील अंबिका चौकात राहत होती. अयोध्याची मैत्रीण वृंदावनी फडताडे हिचे राठोड नावाच्या बॉयफ्रेंड सोबत प्रेमसंबंध होते. परंतु, गेल्या काही दिवसांत अयोध्या आणि राठोड यांच्यात जवळीक वाढली. यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. याच वादातून फडताडे हिने आपल्या मुलाच्या मदतीने अयोध्याची हत्या केली.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी वृंदावनी फडताडे हिने अयोध्याला घरी बोलावून घेतले आणि तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून दुचाकी वर घेऊन बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकला. याप्रकरणी मृत महिलेच्या मैत्रिणीसह चौघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बीडमधील त्रिकोणी प्रेमाची क्रूर कहानी
बीड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी महिलेच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत... तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिने केलेल्या कृत्याबद्दल पश्चातापाचा लवलेश देखील दिसून येणार नाही...माझ्या प्रियकरावर का प्रेम केलंस? म्हणून सख्ख्या मैत्रिणीचा तिने गळा दाबून खून केलाय.. सिनेमातल्या कथानकाला देखील मागे पाडेल अशी क्रूर घटना या आरोपी महिलेने केली.. बीडच्या अंबिका चौक परिसरात वृंदावनी फरताळे या आरोपी महिलेचे घर आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात होमगार्ड पदावर असलेल्या आयोध्या व्हरकडे आणि वृंदावनी फरताळे या दोघींची मैत्री जमली.
ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट...
दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले.... मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती... आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची झाली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला.. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घृण हत्या केली.
प्रेमासाठी मैत्रिणीचा काटा काढला?
विशेष म्हणजे अयोध्या वरकटे आणि वृंदावनी फरताळे या मैत्रिणी होत्या. असे असताना दोघींचा एकच प्रियकर असल्याने मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी वृंदावनीने मोठा कपटी डाव खेळला. मात्र, पोलिसांनी अवघ्या 24 तासांत मृतदेह मिळवला आणि आरोपी वृंदावनीलाही ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास सुरू केला आहे. अयोध्या वरकटे यांची हत्या वृंदावनी हिने एकटीनेच केली की तिला आणखी कुणी मदत केली? यात तिचा प्रियकरदेखील सहभागी होता का? तसेच या हत्येमागे आणखी वेगळी काही कारण आहे का, याचाही शोध बीड पोलीस घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी दिली.
बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे पॅटर्न कायम
बीडमधील गुन्हेगारीचा पॅटर्नचं वेगळा आहे. दिवसेंदिवस तिथल्या गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटनांमुळे बीड चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीचा पॅटर्नने राज्यभरात खळबळ उडवून दिली. त्यानंतर बीडमधील गुन्हेगारी चर्चेत आली. आता देखील गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटनेनं बीड हादरत आहे.

0 Comments