धाराशिव : श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद

धाराशिव : श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद 


धाराशिव: येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव तर्फे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता निर्माण होऊन करिअर निवडीचा मार्ग अधिक सुलभ व्हावा या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, संशोधन पद्धती, शेतीतील यांत्रिकीकरण तसेच कृषी विषयातील नवनवीन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. यावेळी जैवतंत्रज्ञान विभागामध्ये कनिष्ठ पदावर संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. ओंकार पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी टिशू कल्चर तंत्रज्ञान, संकरीत वाण कसे विकसित केले जाते याची सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे, शंकांचे समाधान देखील त्यांनी केले. 

   या सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ व्यतिरिक्त खर्डा येथील ऐतिहासिक किल्ला, पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील प्रेक्षणीय धबधबा, शनिशिंगणापूर व शिर्डी येथील प्रसिद्ध पवित्र स्थळांना देखील भेटी दिल्या.

   ही सहल प्राध्यापक श्री. व्ही. व्ही. वीर, श्री. एल. व्ही. पवार, श्री. पी. टी. गवारे, श्री. पी. एस. माशाळकर, श्री. के. बी. मोहिते, श्री. एस. एल. तेली सौ. पी. बी. मेटे, सौ. के. ए. वडगणे यांच्या नेतृत्वात पार पडली. या सहलीसाठी प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या सहलीसाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख आदींचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments