तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथल नूतन सरपंच सविता उमेश मोटे यांचा ॲड रामचंद्र ढवळे यांच्या हस्ते सत्कार

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथल नूतन सरपंच सविता उमेश मोटे यांचा ॲड रामचंद्र ढवळे यांच्या हस्ते सत्कार

तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथल नूतन सरपंच सविता उमेश मोटे यांचा ॲड रामचंद्र ढवळे यांच्या हस्ते सत्कार

तु़ळजापुर/प्रतिनिधी रुपेश डोलारे:  तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील नुतन महिला सरपंच सविता उमेश मोटे यांची सरपंच पदी  निवड करण्यात आली आहे.गोंधळवाडी येथील ग्रामपंचायतच्या माजी सरपंच कै. रूक्‍मीनबाई विश्वनाथ मोटे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीनामा मंजूर झाला व काही दिवसांनी त्यांचे निधन झाले, यामध्ये गोंधळवाडी ग्रामपंचायत सरपंच पद रिक्त पद होते, यानंतर गोंधळवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड प्रक्रिया बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली. यामध्ये सविता उमेश मोटे यांची सरपंच पदी निवड झाली.या निवडीबद्दल ॲड रामचंद्र ढवळे यांच्या हस्ते सत्कार सत्कार करण्यात आला.यावेळी विकास  हावळे, शहाजी देवगुंडे, फरीद शेख, पोपट मोटे, गोपाळ मोटे, उमेश मोटे, नारायण जानराव आदींनी सरपंच सविता उमेश मोटे यांचा सन्मान करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments