सततच्या पावसाने शेतकरी राजा चिंताग्रस्त इटकळ व परिसरातील खरीप पिके जमीनदोस्त.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी प्रत्यक्ष शेतीवर जाऊन केले नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
हाता तोंडाशी आलेली खरीप पिके झाली उद्ध्वस्त.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- सतत बरसणाऱ्या पावसामुळे मौजे इटकळ व परिसरातील खरीप पिके जमीनदोस्त शेतकरी राजा चिंताग्रस्त.यावर्षी मे पासूनच पावसास सुरुवात झाल्याने जून मध्येच शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली.चांगली ओल असल्याने खरीप पिके चांगली उगवली आता फुले व फळ लागत असतानाच गेल्या महिन्याभरापासून पावसाची दररोज ची हजेरी शेतकऱ्याच्या जीवावर बेतली चांगली हातातोंडाशी आलेली खरीप पिके उडीद सोयाबीन तूर मूग कांदा हे अति पाण्यामुळे मातीमोल झालेली आहेत.त्यामुळे शेतकरी राजाची खरीप पिकांची आशा जवळपास मावळली असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.इटकळ व परिसरातील केशेगाव , बाभळगाव, खानापुर, केरुर , धनगरवाडी, फुलवाडी, उमरगा चि., येवती, दिंडेगाव , काळेगाव, काटगाव, हिप्परगा ताड, आरबळी, गूळहळी, निलेगाव आदि भागात पावसामुळे खरीप पिकांचे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्या त्या गावातील तलाठी यांच्या कडून प्रत्यक्ष शेतीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.मौजे इटकळ येथे ही शुक्रवार दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी खरीप पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. अतिवृष्टी होऊन सोयाबीन व इतर पिकाचे खूप नुकसान झाले असल्याने शेतीवर जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.यावेळी ग्राम महसूल अधिकारी तोडकरी साहेब,सहाय्यक कृषी अधिकारी कुलकर्णी साहेब,पोलिस पाटील विनोद सलगरे, केशेगावचे सरपंच मल्लिनाथ गावडे दमाजी सरपंच अरविंद पाटील ,माजी सरपंच राहुल बागडे,भाजप बूथ प्रमुख श्रीकृष्ण मुळे,सचिन वाघोळे ,रितेश माशाळकर ,महेश जळकोटे आदी उपस्थित होते.


0 Comments