तुळजाभवानी मंदिरातील जिर्णोद्धार काम व जुने बसस्थानक पाडून नवीन निकृष्ट दर्जाचे बांधकामाची सरकारच्या सचिवालयामार्फत सखोल चौकशी कायदेशीर कारवाई करावी-
मधुकर शेळके यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
तुळजापुर: तुळजाभवानी मंदिरात होत असलेल्या 58 कोटी रुपयांच्या जीर्णोद्धार काम व शहरातील जुने बस स्थानक पाडून नवीन विक्रष्ट दर्जाचे बांधकाम केलेले या कामाची सरकारच्या सचिवालय मार्फत सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मधुकर बबनराव शेळके व किरण यादव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात अशी नमूद करण्यात आली आहे की, तुळजाभवानी मंदिर संस्थान स्वनिधीतून मंदिरचा जिर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतलेले आहे.या कामासाठी शासनाकडून कसलीच आर्थिक मदत न घेता देवि भक्तांनी अर्पण केलेल्या देणगीतून हे बांधकाम होणार आहे.सदरील कामासाठी कुशल कामगार व कुशल यंत्रणा आहे का त्याची तपासणी कोणी केली याची माहिती दिली जात नाही. नवीन दगडी खांबे कोणत्या पाषानातून केली जाणार आहे त्याची पहानी व तपासणी कोणी केली याची माहिती दिली जात नाही.सदरील जिर्णोद्धाराचे काम हे दि.२७/०९/२०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक संचालक पुरातत्व यांनी मे.साईप्रेम कन्स्ट्रक्शन लातूर व मे.सवानी कन्स्ट्रक्शन हेरिटेज प्रा.लि.मुंबई यांना सहा कामाचे विभागून कार्यारंभ आदेश दिलेले आहेत.सदर कामाचे ५८ कोटीवरून कधी १२५ कोटी होईल सांगता येणार नाही.सदरील कामावरती जबाबदार अधिकारी नसल्याने पुरातत्व विभागाचे नियम डावलून चुकीच्या पद्धतीने मंदिर जिर्णोद्धाराचे काम होत आहे.याच हलगर्जीपणामुळे मंदिरातील उपदेवता स्थलांतरीत करीत असताना ब्रह्मदेवताची मुर्ती भंग पावली सदरील घटना होवून तीन ते चार महिने होवून देखील पुरातत्व विभागाने किंवा मंदिर संस्थानने झाल्या चुकीची जबाबदारी घेतलेली नाही.या प्रकरणास जबाबदार असलेले मंदिर व्यवस्थापक तसेच पुरातत्व विभागाचे अधिका-यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच तुळजापूर येथील जुने बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्टॅन्ड साठी सुरूवातीला तीन कोटीचा निधी मंजूर झालेला पण त्यात वाढीव आठ कोटी रूपये दाखवून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.कोणत्याही पद्धतीचे दर्जेदार काम न करता शासनाकडून वाढीव निधी उपलब्ध करून भ्रष्टाचार केलेला आहे.सध्या तुळजापूरात विकासाच्या नावावर काही राजकीय पुढार्याकडून मोठा भ्रष्टाचार राजरोषपणे होत आहे.तक्रार देणा-यावरती दबाव टाकला जात आहे.धमकावले जात आहेत.
तरी वरील दोन्ही कामाची राज्य सरकारने उच्चस्तरीय सचिवालयामार्फत चौकशी समिती नेमून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी.अशी मागणी आमच्याकडून वरील सर्व मान्यवरांना निवेदनाने करत आहोत. अशी निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेळके व किरण यादव यांच्या स्वाक्षरी आहेत.



0 Comments