अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेऊन अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यातील घटना
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार, नागपूर येथून ठोकल्या तरुणाला बेड्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे : एका अल्पवयीन मुलीस वर्षभरापूर्वी पळवून नेऊन लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करून बार्शी पोलिसांनी नागपूर येथून आरोपीला अटक अटक करून न्यायालयात हजर केले न्यायाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बार्शी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस 11 जुलै 2024 रोजी पळवून नेले याबाबत पीडित मुलीच्या पित्याने पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ती बाथरूमला जाते सांगून बाहेर गेली तिचा सर्वत्र शोध घेतला पण मिळून आली नाही तिला कोणीतरी फुस लावून पळून नेल्याची फिर्याद देताच पांगरी पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला होता.
पांगरी पोलीस या घटनेचा तपास करीत असताना पीडित मुलगी व तिच्यासोबत आरोपी सवणे हे दोघे नागपूर येथील टेलिफोन नगर दिघोली येथे राहत असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर थेट पोलीस नागपूर गाठले आणि चार ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी व आरोपी सवणे याला पोलीस स्टेशनमध्ये हजर केले.
दरम्यान पीडित मुलीने दिलेल्या जबाब स्वतः अल्पवयीन असताना लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला नागपूर येथे नेऊन खोली भाड्याने घेऊन राहिले तेथे तिच्यावर वारंवार अत्याचार केला याची वाच्यता कोठे केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे जबाब अल्पवयीन मुलीने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments