प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे (अंधारे)यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान— शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा
अकलूज/प्रतिनिधी संजय निंबाळकर— शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करत असलेल्या प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (बामू)येथून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे शिक्षण व संशोधन क्षेत्रात त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे.
“Competitiveness of Indian Agricultural Exports: Trends and Growth Rate” या अत्यंत महत्त्वपूर्ण व समकालीन विषयावर त्यांनी आपला संशोधन प्रबंध सादर केला. त्यांच्या संशोधनाचे मार्गदर्शन प्रा. डॉ. ज्ञानदेव मोरे यांनी केले.
प्रा. मिनाक्षी जगदाळे यांनी आपल्या संशोधनात भारतीय कृषी निर्यातीचा अभ्यास करताना त्यातील स्पर्धात्मक घटकांचे सखोल विश्लेषण केले आहे. जागतिक व्यापाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय कृषी क्षेत्राच्या निर्यातीतील प्रवृत्ती, वाढ दर, आणि भविष्यातील धोरणात्मक संधी-आव्हानांचा अभ्यास त्यांनी संशोधनात मांडला आहे. त्यांचा हा प्रबंध कृषी अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि धोरणनिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.
प्रा. जगदाळे या शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी अध्यापिका म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या अध्यापनातून आणि संशोधनातून अनेक विद्यार्थ्यांना दिशा दिली आहे.
त्यांचे शिक्षण B .Sc.,BA,DSM,MA( English) , MA ( Soc), MA( Eco), MSW, (HR), MBA(HR), BEd ,MPhil (HR), MPhil( Eco) ,PhD (International Economics ). अशा अकरा पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत, PhD ही त्यांची बारावी पदवी त्यांनी मिळवली आहे. त्याचबरोबर सामाजिक मध्ये त्यांनी जिजाऊ ब्रिगेड चे अगोदर जिल्हा कार्याध्यक्ष आणि सध्या महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड चे पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत.आणि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक प्रा. डॉ. ज्ञानदेव मोरे, सहकारी प्राध्यापक, महाविद्यालयीन प्रशासक, विद्यार्थी, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. मिनाक्षी जगदाळे म्हणाल्या, “हे यश हे केवळ माझे नाही, तर माझ्या कुटुंबीयांचे, मार्गदर्शकांचे, सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे आहे. विशेषमाझे सासरे कै. शिवाजीराव जगदाळे या सर्वाच्या विश्वासाने आणि पाठिंब्यानेच हे शक्य झाले.” पती अमोलशेठ जगदाळे, मूले समर्थ, पार्थ आई सौ विनोदिनी, वडील श्री सुभाष गोविंद अंधारे, भाऊ जयंत, सुमंत, गुणवंत, श्रीपती जगदाळे,संपूर्ण जगदाळे परिवार,डॉ. रविराज फुरडे या सर्वांचे सहकार्य लाभले असे सौ. जगदाळे आवर्जून सांगतात.
प्रा.डॉ.मिनाक्षी अमोल जगदाळे (अंधारे)यांचे हे शैक्षणिक यश नव्या संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
0 Comments