वडिलांच्या देहदानाचा संकल्प मुलांनी केला पूर्ण, तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील सूर्यवंशी कुटुंबाचा प्रेरणादायी संदेश
चिवरी /राजगुरु साखरे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील सेवानिवृत्त शिक्षक सुभाष काशिनाथ सूर्यवंशी यांचे दि,७ रोजी निधन झाले निधनानंतर त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी देहदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या तीन मुलांनी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण केला.
स्वर्गीय सुभाष काशिनाथ सूर्यवंशी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी दि,७ रोजी पहाटे निधन झाले. निधनानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी वडिलांच्या संकल्पाची पूर्ती करून देहदानासाठी त्यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव यांच्याकडे सुपूर्द केला .त्यांनी मृत्यूपूर्वी देहदान करण्याचा संकल्प केला होता. दरम्यान, सुभाष सूर्यवंशी हे पेशाने शिक्षक होते त्यांनी ४० वर्षे विद्यादानाचे पवित्र कार्य केले. मृत्यूनंतरही आपली शरीर विद्यार्थ्यांना मानवी शरीर अभ्यासासाठी उपयोगी व्हावे यासाठी देहदान करण्याचा संकल्प करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी केलेला संकल्प सूर्यवंशी परिवारांनी पूर्ण केला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असे. ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे’ असे समर्थवचन सूर्यवंशी कुटुंबियांनी ते वास्तवात उतरवले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून विविध स्तरांतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे .हा देहदानाचा संकल्प पूर्ण केल्यामुळे सूर्यवंशी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मृत्यूनंतरही जपली शिकवण
शिक्षक हे केवळ शाळेतच शिकवतात असे नाही तर ते आयुष्यभर आपल्या शिकवणीतून प्रभाव टाकतात ,पिढ्या घडवतात परंतु याही पलीकडे जाऊन मृत्यू नंतरही आपले शरीर सूर्यवंशी गुरुजींनी शिकवणीसाठीच अर्पण केले, सूर्यवंशी गुरुजी यांच्या कुटुंबाने दुःखाच्या प्रसंगी मोठा निर्णय घेत समाजाला प्रेरणादायी संदेश दिला आहे त्यांच्या देह दानामुळे येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीर रचनाशास्त्राच्या अभ्यासासाठी मदत होणार आहे.
0 Comments