सोयाबीनचे पिकात म्हशीचे वासरू गेल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना
धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: सामाईक बांधावर चरत असताना म्हशीचे वासरू सोयाबीन पिकात शिरल्याच्या कारणावरून 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुरडी शिवारात भावकीतील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली दोन्ही बाजूने काठ्या दगडाने हाणामारी झाल्याने दोन महिला जखमी झाल्या असून त्यांनी 30 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील सुरडी शिवारात माळी कुटुंबीयांची शेती आहे यातील कमल गोवर्धन माळी वय (60) या 27 जुलै रोजी सकाळी १० वाजता शेतात असताना त्यांच्या म्हशीचे वासरू सामाईक बांधावरून चरत भावकीच्या शेतात गेले यावर भावकीतील बाळू दगडू माळी, दगडू पांडुरंग माळी, जया दगडू माळी यांनी कमल माळी यांना वासरू शेतात सोडल्याचा आरोप करीत वाद घातला; तसेच लाथा बुक्क्यांनी काठीने मारहाण करून जखमी केली आरोपीनेही त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार 30 जुलै रोजी राजी कमल माळी यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली यावरून उपरोक्त तिन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याच वादातून जयश्री दगडू माळी वय 50 यांनीही पोलिसाकडे तक्रार दिली आहे भावकीतील आरोपी गोवर्धन पांडुरंग माळी ,कमल गोवर्धन माळी, मारुती गोवर्धन माळी या तिघांनी त्यांच्या म्हशीचे वासरू सोयाबीनच्या रानात का सोडली अशी विचारणा केल्याने शिवीगाळ करून दगडाने मारहाण करीत जखमी केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रारीत म्हटले आहे यावरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments