श्री.क्षेत्र गहिनीनाथ गड येथे चातुर्मास सत्संग सोहळ्यात दही धपाट्याच्या महाप्रसादाचे आयोजन

Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री.क्षेत्र गहिनीनाथ गड येथे चातुर्मास सत्संग सोहळ्यात दही धपाट्याच्या महाप्रसादाचे आयोजन

श्री.क्षेत्र गहिनीनाथ गड येथे चातुर्मास सत्संग सोहळ्यात दही धपाट्याच्या महाप्रसादाचे आयोजन.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

*रामभक्त वैजनाथ गुट्टे यांनी श्रीराम कथेचे केले निरूपण.*

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- हभप. सुरदास बाबाराव महाराज मुरकुटे यांच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड देवकरा येथे श्रीसंत मोतीराम महाराजांच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त साकारत असलेल्या भव्य दिव्य चातुर्मास सत्संगसोहळ्यात सोमवार दिनांक २५/८/२०२५ रोजी मौजे हनुमंत जवळगा ता चाकूर येथील श्रीराम भक्तांनी दही धपाट्याची मधूकरी परंपरेनुसार महाप्रसादाचे आयोजन केले होते.रामभक्त हभप वैजनाथ महाराज गुट्टे यांच्या मुखार्विंदातून सकाळी 11 ते 2 यावेळेत श्रीरामकथा संपन्न झाली गहिनीनाथ गड परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने कथा व भोजनासाठी उपस्थिती दर्शविली होती.हनुमंत जवळगेकरांनी एक ट्रक घेऊन मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली होती त्यांचा उत्साह आणि केलेल्या सेवेचे सगळीकडेच कौतुक होत असून गहिनीनाथ गडाची सेवा करुन आशिर्वाद घेण्याची भावना प्रत्येकात निर्माण होत आहे.देवकरा नगरीच्या भाविकांनी तसेच आलेल्या पाहुण्यांचा सत्कार व सेवा करण्याचा मोठा आनंद घेतला.


Post a Comment

0 Comments