दुर्दैवी घटना : धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू हिंगोली जिल्ह्यातील घटना Hingoli News

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू हिंगोली जिल्ह्यातील घटना Hingoli News

दुर्दैवी घटना : धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू हिंगोली जिल्ह्यातील घटना 


हिंगोली/प्रतिनिधी रुपेश डोलारे  : तालुक्यात प्रसिद्ध असलेला पारोळा येथील धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 18 रोजी दुपारी घडली गोविंद गंगाधर लोंढे असे मयत तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की औंढा नागनाथ (Aandha Nagnath)तालुक्यातील मेथा येथील पंचवीस वर्षे युवक गोविंद गंगाधर लोंढे हा आपल्या काही मित्रा समवेत हिंगोली(Hingoli)  तालुक्यातील पारोळा येथे पोहण्यासाठी तसेच धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता दोन दिवसापासून जोराचा होत पाऊस असल्याने पोहताना तसेच धबधब्याचा आनंद घेताना पाण्याचा अंदाज नाल्याने तो एका ठिकाणी पाय घसरून पाण्याचा प्रवाहात गेला; सोबत असलेल्या मित्रांनी त्याला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु प्रवाह जोराचा असल्याने तो पुढेच वाहत गेला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला‌. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी गोविंद गंगाधर लोंढे याला  हिंगोली(Hingoli)  येथील शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दुपारी घडलेल्या घटना नंतर सायंकाळी उशिरा त्याच्या पार्थिवावर शवाविच्छेदन करण्यात आले त्याच्या पश्चात  आई-वडिल, दोन भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


सोमवारी दुपारच्या सुमारास गोविंद गंगाधरराव लोंढे (वय २५) आपल्या मित्रासोबत धबधब्यावर पोहण्यासाठी आला होता. तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. धबधब्याचा तीव्र प्रवाह असल्याने प्रवाहात गोविंद अडकला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments