तुळजापूर तालुक्यात हिंस्र प्राण्याचे पाळीव प्राण्यावर हल्ले सुरूच,Tuljapur Tiger Attack Animals Farmers

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात हिंस्र प्राण्याचे पाळीव प्राण्यावर हल्ले सुरूच,Tuljapur Tiger Attack Animals Farmers

तुळजापूर तालुक्यात हिंस्र प्राण्याचे पाळीव प्राण्यावर हल्ले सुरूच, सावरगाव काटी परिसरात सहा कुत्र्याच्या पिल्लांचा पाडला फडशा ; बिबट्या  की वाघ ? संभ्रम कायम  पशुपालकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


तुळजापूर/प्रतिनिधी रुपेश डोलारे  : मागील सहा महिन्यापासून तुळजापूर तालुक्यामध्ये हिंस्र  प्राण्याने धुमाकूळ घातला असून यांच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह पशुपाल वर्गामध्ये दहशत पसरली आहे. मागील दोन दिवसा खाली या प्राण्यांनी सिंदफळ अमृतवाडी  परिसरातील शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करून मोठी नुकसान केले होते .त्याचबरोबर आता सावरगाव काटी परिसरात डॉ. काझी यांच्या शेतातील रविवारच्या रात्री सहा कुत्र्याच्या पिल्यावर हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे तर एक म्हशीची वासरू गंभीर जखमी केले आहे या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठी आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला वाघ किंवा बिबट्या याच प्राण्यांनी केल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे. त्यामुळे याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन या प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

हे हिंस्र प्राणी तुळजापूर तालुक्यातील विविध भागात मागील सहा महिन्यापासून धुमाकूळ घालत आहे कोणी बिबट्या असल्याचे सांगते तर कोणी वाघ असल्याचे सांगितले जात आहे., या प्राण्याच्या पाऊल खुणा ही शेत शिवारात दिसून येत आहेत मात्र वन विभागाने अद्याप तरी या प्राण्याचे ठसे वाघ ,बिबट्या असल्याचे दुजेरा दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या हिंस्र प्राण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.


 ६ कुत्र्यांच्या पिलांचा फडशा, तर एक म्हशीची वासरू गंभीर जखमी पण कुठल्या प्राण्याने? संभ्रम कायम

सविस्तर वृत्त असं की, तुळजापूर तालुक्यात मागील दोन दिवसा खाली महादेव आणि आबासाहेब गंधुरे या दोन सख्ख्या भावांना मोठ्या नुकसानीस सामोरं जावं लागलं आहे. याचं कारण तो अज्ञात हिंस्त्र प्राणी. त्याने दोन्ही भावांचा 2 बैलांचा फडशा पाडलेला आहे. तर एक बैल गंभीर जखमी आहे, त्याचबरोबर नुकतेच दिनांक 18 रोजी रात्री काटी येथील डॉक्टर काझी यांच्या गोठ्यातील एका म्हशीच्या वासरावर व सहा कुत्र्यांच्या पिल्लावर हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे या घटनांमुळे परिसरात चांगलीच भीती पसरली आहे.
हिंस्र  प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले म्हशीचे वासरू



Post a Comment

0 Comments