करजखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची पिडीत कुटुंबीयांची मागणी, १८ ग्रामपंचायततिने एकमुखाने ठराव घेऊन केली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी-Karajkheda Dharashiv Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

करजखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची पिडीत कुटुंबीयांची मागणी, १८ ग्रामपंचायततिने एकमुखाने ठराव घेऊन केली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी-Karajkheda Dharashiv Crime News

करजखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची पिडीत कुटुंबीयांची मागणी, १८ ग्रामपंचायततिने एकमुखाने ठराव घेऊन केली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


 धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे :  तालुक्यातील करजखेडा येथे दिनांक १३ रोजी भर चौकामध्ये शेतीच्या वादातून पवार दांपत्याचा निर्गुण खून करण्यात आला. या घटनेमुळे तालुक्यासह परिसरात संतापाची लाट उसळली होती. आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी मौजे करजखेडा ता. धाराशिव येथील . पीडित कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने उपोषण करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा आक्रोश केला होता.

या घटनेत मौजे धानुरी येथील मुलगी प्रियंका सहदेव पवार व जावई सहदेव पवार यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.या प्रकरणी परिसरातील 18 ग्रामपंचायतींच्या कार्यालयांनी ठराव घेऊन, आरोपीला फाशीची शिक्षा लागू करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण मकोका लागू करण्यासाठी जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची विनंती जिल्हाधिकारी कार्यालयास केली आहे.

 यामध्ये ठराव देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या यादीत धानोरी, माकणी, काटी चिचोली, तोरंबा, करवंजी, राजेगाव, एकोंडी लो., कोंडजीगड, मुर्शदपुर, चिंचोली रेबी, होळी, सालेगाव, सास्तुर, खेड, हराळी, हिप्परगा सय्यद, लोहारा खुर्द, तावशीगड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सदर ठराव व मागणीची माहिती मुख्यमंत्री , गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र, जिल्हा पोलीस अधिक्षक धाराशिव, पोलीस उपअधिक्षक धाराशिव, तहसिलदार साहेब यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.ग्रामस्थांचे आणि मृतांचे नातेवाईकांचे म्हणणे आहे की, या घटनेत आरोपींविरोधात तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी आणि योग्य ती कठोर शिक्षा देण्यात यावी.


Post a Comment

0 Comments