दुर्दैवी घटना : वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी लावलेल्या कुंपणातील वीज प्रवाहाचा शॉक लागून एकाच कुंटुबातील पाच जणांचा मृत्यू , दीड वर्षाची चिमुकली बचावली-
जळगाव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताला केलेल्या कुंपणातील वीज प्रवाहामुळे जबर शॉक लागून एकच कुटुंबातील पाच आदिवासी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धारक घटना 20 ऑगस्ट रोजी घडली आहे तर या घटनेत एक वर्षाची बालिका सुदैवाने बचावली आहे या घटनेमुळे सर्वत्र व्यक्त केली जात आहे या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील पाच सदस्य मृत्युमुखी झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.ऐन बैलपोळा सणाच्या तोंडावर पावरा कुटुंब दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणाचा सखोल तपास एरंडोल पोलीस करत आहेत.
या दुर्घटनेत विकास रामलाल पावरा वय (30) त्यांची पत्नी सुमन विकास पावरा वय (25) तसेच त्यांची दोन मुले पवन विकास पावरा वय (4) व कव्वाल विकास पावरा वय (3) हे तर विकास पावरा यांच्या सासूचा ही मृत्यू झाला मात्र विकास पवार यांच्या सासूचे नाव कळू शकले नाही या सर्व आदिवासी मजुरांचा जळजळी मृत्यू झाला असून सुदैवाने या दुर्घटनेतून एक वर्षाची दुर्गा विकास पावरा ही बालिका बालंमबाल बचावली आहे . हे सर्व आदिवासी मजूर पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील रहिवासी आहेत तर त्यांची मूळ गाव हे मध्य प्रदेशातील बुरानपुर जिल्ह्यातील खटना तालुक्यातील आहे ते सध्या वरखेडी येथील शेतमालका मालक बंडू युवराज पाटील यांच्याकडे कामाला होते दरम्यान शेतमालखाने शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या कुंपणात विजेचा तारांचा वापर करून वीज प्रवाह सुरू ठेवला होता परंतु या गोष्टीची कसलीही कल्पना या मजुरांना नसल्यामुळे विजेच्या जबरदस्त धक्क्याने या पाचही जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
शेतमालकावर दाखल होणार गुन्हा
या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेले पाचही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात घालवण्यात आले आहेत तर वरखेडी येथील शेत मालक बंडु पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम एरंडोल पोलीस करत आहेत.

0 Comments