अनैतिक संबंधात पतीचा अडसर, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा; लातूर जिल्ह्यातील घटना- Latur Crime News Love Affairs

Hot Posts

6/recent/ticker-posts

अनैतिक संबंधात पतीचा अडसर, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा; लातूर जिल्ह्यातील घटना- Latur Crime News Love Affairs

अनैतिक संबंधात पतीचा अडसर, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा; लातूर जिल्ह्यातील घटना- 

लातुर/प्रतिनिधी रूपेश डोलारे:  विवाहित प्रेमियुगलांच्या अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीसह तिच्या प्रियकरांनी व अन्य तीन मित्राच्या मदतीने बुधवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी खुन( Murder)  केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवार दि, 28 रोजी सायंकाळी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताची पत्नी व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विनोद धनराज जनवाडे राहणार (एसटी कॉलनी मुळे नगर उदगीर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार दिनांक 27 रोजी सायंकाळी चार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान फिर्यादीचा चुलत भाऊ मयत हनुमंत शरणाप्पा जनवाडे वय 40 राहणारा( पार कट्टी गल्ली उदगीर) यांना त्यांची पत्नी पूजा हनुमंत जनवाडे व तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील राहणार जानापुर तालुका उदगीर यांनी त्यांच्या तीन मित्रांच्या मदतीने जबरदस्तीने ऑटो रिक्षात घालून नेले मयताची पत्नी पूजा व तिचा प्रियकर मित्र सुनील उर्फ पिंटू पाटील यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने मयत हनुमंत जनवाडे यांना ऑटो रिक्षातून तालुक्यातील लोणी मोड जवळील इच्छापूर्ती मंदिराजवळ नेण्यात आले तिथे हनुमंत जनवाडे यांच्या डोके, पोट, हातपाय ,पिंडरीवर जबर मारहाण करून त्यांचा खून केला याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ विनोद जनवाडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हनुमंत जनवाडे यांची पत्नी आरोपी पूजा तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील यांना खून करण्यासाठी मदत करणारे त्यांचे तीन मित्र यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार दाखल केली आहे त्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 546 / 25 कलम १०३ (1) 137 (2) ,3 (5) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या खून प्रकरणात मैताची पत्नी पूजा व तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील यांना ताब्यात घेण्यात आली आहे या अटकेची कारवाई सुरू आहे आणि तीन आरोपी फरार असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी सांगितले या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments