पुण्यात जवळील खेडच्या कुंडेश्वरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकप चे ब्रेक फेल झाल्याने भिषण अपघातात १० महिला ठार,२७ जण जखमी-Pune-khed-kundeshvar Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यात जवळील खेडच्या कुंडेश्वरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकप चे ब्रेक फेल झाल्याने भिषण अपघातात १० महिला ठार,२७ जण जखमी-Pune-khed-kundeshvar Accident News

पुण्यात जवळील खेडच्या कुंडेश्वरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकप चे ब्रेक फेल झाल्याने भिषण अपघातात १० महिला ठार,२७ जण  जखमी-


पुणे/प्रतिनिधी रूपेश डोलारे :  खेड तालुक्यातील श्री क्षेञ कुंडेश्वर (Kundeshwar) मंदिराच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या पिकप ला सोमवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला यात पिकप मधील एकूण ३७ जणांपैकी १० महिला ठार झाले असून लहान मुले व चालकासह एकूण २७ जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की श्रावणी सोमवार निमित्त पाईट पापळवाडी तालुका खेड येथील 36 जण आणि चालकासह एकूण 37 जण पिकप मधून डोंगरावर असलेल्या कुंडेश्वर च्या दर्शनासाठी निघाले होते.दि,११ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास डोंगरावरील वळणावर पिकप चे ब्रेक फेल (Pickup break Fail) होऊन गाडी रिव्हर्स येऊ लागतात चालक ऋषिकेश करंडे यांनी पिकप मधून उडी मारली.याचवेळी पिकप गाडी 25 ते 30 फूट डोंगरावरून खाली कोसळली या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत जखमींची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना तातडीने स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णालय दाखल करण्यात आले.

या अपघातातील  मृतांची नावे 

१शोभा ज्ञानेश्वर वय (२७) 

२.सुमन काळूराम पापड वय (४७) 

३.शारदा रामदास चोरघे वय (४५) 

४.मंदा कानिफ दरेकर वय (५५ ) 

५.संजीवनी कैलास दरेकर वय (५५) 

६.मीराबाई संभाजी चोरघ वय (५५) 

७.बहिणाबाई ज्ञानेश्वर दरेकर, 

८.शकुंतला तानाजी चोरगे वय (५०)

 ९.पार्वती दत्तू पापड,

१०. फसाबाई प्रभू सावंत.

पिंपरी ,चाकण ,खेड ची पोलीस पथक घटनास्थळी

पिंपरी चिंचवड ,चाकण, खेड पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोहचून बचाव कार्य हाती घेतली अनेक महिला जखमी अवस्थेत पडल्या होत्या त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केली तसेच पिकअप डोंगरावरून कोसळल्याने जागीच तीन-चार होऊन अधिक महिलांचा मृत्यू झाली.

पाईट पापळीवाडीवर शोककळा

श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असल्याने पाइट पापळवाडीतील महिलांनी देवदर्शन करण्याचे ठरवले होते सकाळी पिकअप गाडीतून गावापासून जवळच असणाऱ्या कुंडेश्वरच्या शिव मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी निघाली मात्र डोंगर उतारावर गाडी पलटी होऊन अनेक महिलांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्या या घटनेची वार्ता गावात समजतात सर्वत्र गावावर शोक कळा पसरली आहे.


उपचार घेत असलेल्या महिलांमध्ये  अलका चोरघे , रंजना कोळेकर, मालुबाई चोरघे , जया दरेकर , लताबाई करंडे , ऋतुराज कोतवाल (लहान मुलगा) ऋषिकेश करंडे ,निकिता पाइट, जयश्री पाईट, शकुंतला चोरघे , मनीषा दरेकर , लक्ष्मी कोळेकर, कलाबाई लोंढे , जनाबाई करंडे , पार्वतीबाई कोळेकर, सुप्रिया लोंढे ,निशांत लोंढे , सिद्धी पाईट , कविता चोरघे , सुलाबाई  चोरघे, सिद्धीकर चोरघे , सुलोचना कोळेकर मंगलदारी कर पूनम पाइट,  जाईबाई पापळ, चित्रा करंडे ,चंद्रभागा दरेकर ,मंचा पापळ यांचा समावेश आहे.

कुंडेश्वर येथील मंदिर असे आहे

कोहिंडे बुद्रुक ,पाईट, तळवडे वाशरी हे दररोज या पाच गावच्या डोंगराच्या सीमेवर हा महागाई डोंगर वसलेला आहे अध्यात्म आणि जैवविविधतेचा समतोल राखणारी आणि साक्षात कुंडेश्वर शिव शंकराची वास्तव असणारे पुरातन कालीन मंदिर आहे महाशिवरात्रीला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भावी किती दरवर्षी येतात या स्थळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे तेलीन बाईची दंतकथा पवित्र गायमुख म्हणजेच को मंडला नदीची उगमस्थान असंख्य औषधी वनस्पती या ठिकाणी आहेत भीमाशंकर प्रमाणे इतर जी उपज्योतिर्लिंग आहेत त्यात श्रीक्षेत्र कुंडेश्वराचा समावेश होतो अतिशय निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असून पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये मनमोहक वातावरण असते या तीनही ऋतूमध्ये येथे पर्यटनासाठी पर्यटन दर्शनासाठी भावीक येत असतात.

कुंडेश्वर दुर्घटनेनंतर मदतीसाठी धावा धाव

पाईट येथे श्रीक्षेत्र कुंडेश्वर ला जाणाऱ्या महिलांच्या पिकप गाडीचा भीषण अपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी परिसरातील कार्यकर्ते, देवस्थानचे संचालक यांनी सर्वोत्तरी मदत केली रुग्णवाहिका येईपर्यंत खाजगी वाहनाने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले सदर घटनेची तात्काळ माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयशिंग दरेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी स्वीय सहाय्यक राम चौगुले यांच्याशी संपर्क साधला त्यांनी जखमी उपचार घेत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क करून जखमींना सर्वतोपरी मदत करण्यास सांगितले घटनेची माहिती मिळताच आमदार बाबाजी काळे, यांचे सुपुत्र मृण्मय काळे ,माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर ,माजी उपसभापती अमोल पवार, माजी सभापती भगवान पोखरकर, सभापती विजयसिंह शिंदे ,राजगुरुनगर बँके संचालक गणेश थिगळे,, बाजार समितीचे संचालक विनोद टोपे, रंणजीत गाडे युवक चे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे दूध संघाची संचालक अरुण चांभारे ,संजय रौंधळ, शिवाजी मांदळे ,रोहित डावरे श्रीनाथ लांडे यांनी सर्वतोपरी मदत करण्यासाठी सहकार्य केले आमदार बाबाजी काळे यांनी ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन मृत्यू झाल्याची रुग्णाच्या कुटुंबांना मदतीसाठी प्रयत्न करू अशी सांगितली यावेळी विपुल खेंगले व त्याचे वडील संजय केंद्रे यांनी सदर घटना घडल्यावर परिसरातील नागरिकांसाठी मदत साठी आव्हान केले.

पाईट येथे श्रीक्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे तसेच अपघात असताना सर्वतोपरी मदत करण्यात यावी यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आले आहेत या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता बहिणींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मयतांच्या कुटुंबाप्रतिम संवेदना व्यक्त करतो या कठीण प्रसंगात शासन त्याच्यासोबत ठामपणे उभे आहे

                                 अजित पवार उपमुख्यमंत्री


Post a Comment

0 Comments