तरुणास बेदम मारहाण करून रोकड लंपास, तुळजापुर पोलिस ठाण्यात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारात एका तरुणास तीन जणांनी लोखंडी रॉड कोयता याने बेदम मारहाण करून त्याच्या जवळील रोकड लंपास केल्याची घटना दि, 8 रोजी घडली आहे याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील 42 हजार पाचशे रुपये लुटल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे ही घटना 8 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी राजेंद्र लांडगे वय २४ (राहणार अमृतवाडी तालुका तुळजापूर) हा सेनगाव शिवारात खंडोबाच्या माळावर मंदिराच्या पाठीमागे असताना आरोपी विकास जाधव, राजा देवशिंग जाधव व एक व्यक्ती( सर्व राहणार ढेकरी तालुका तुळजापूर) हे तेथे आले व राजेंद्र यास तू लय माजलास काय असे म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी लोखंडी रॉड व कोयत्याने बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील 42,500 हजार रुपये रोकड लुटून नेली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता कलम 118 (1),115(2), 351(2), 352,351(3), 3 (5),119 (1) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments